AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि RSS चे काम दंगली भडकवणे आणि मशिदींवर हल्ला करणे, संजय राऊतांचा गंभीर आरोप

संजय राऊतांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या आणि वाढत्या सामाजिक अस्थिरतेसाठी जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी या संघटनांवर स्वतःवर नियंत्रण नसल्याचा आणि दंगली भडकवण्याचा आरोप केला आहे.

बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि RSS चे काम दंगली भडकवणे आणि मशिदींवर हल्ला करणे, संजय राऊतांचा गंभीर आरोप
sanjay raut Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 16, 2025 | 2:16 PM
Share

“आज दुर्दैवाने हा देश त्याच प्रकारच्या लोकांच्या हातामध्ये गेला आहे. बजरंग दल असेल, विश्व हिंदू परिषद असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल यांच्या स्वतःवरचा नियंत्रण संपलेला आहे. महाराष्ट्रामध्ये 3000 च्या आसपास शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या याच्यावरती राष्ट्रीय स्वयंसेवक आणि एकदा तरी आपली भूमिका व्यक्त केली का?” असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला.

संजय राऊत यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना औरंगजेबाच्या कबरीवरुन सुरु असलेला वाद आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघ यांसह विविध मुद्द्यांवर प्रश्न विचारण्यात आला. “जेव्हा पाकिस्तान निर्माण होत होता, तेव्हा या देशात काही लोकांनी परिस्थिती निर्माण केली. हा देश विभाजनाकडे चालला आहे. 1947 च्या आधीची परिस्थिती आणि आताच्या परिस्थितीत मला फार फरक दिसत नाही”, असे संजय राऊत म्हणाले.

दुर्दैवाने देश त्याच प्रकारच्या लोकांच्या हातामध्ये गेलाय

“जेव्हा पंडित नेहरू म्हणाले होते फाळणी झाली आणि धर्माच्या आधारावर पाकिस्तान निर्माण झाला. त्या पंडित नेहरू यांचे मान्य होते भारत याचा मी हिंदू पाकिस्तान होऊ देणार नाही. धर्मांध लोकांच्या हातामध्ये कोणीही असेल. हिंदू असतील किंवा मुस्लिम असतील हा देश जाऊ देणार नाही. आज दुर्दैवाने हा देश त्याच प्रकारच्या लोकांच्या हातामध्ये गेला आहे. बजरंग दल असेल, विश्व हिंदू परिषद असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल यांच्या स्वतःवरचा नियंत्रण संपलेला आहे. त्यांना फक्त दंगली घडवणं. मशिदींवर हल्ली करणे, हिंदू तरुणांची डोकी भडकवणे हेच काम शिल्लक आहे. या महाराष्ट्रामध्ये 3000 च्या आसपास शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. यावर राष्ट्रीय स्वयंसेवक आणि एकदा तरी आपली भूमिका व्यक्त केली का?” असा सवाल संजय राऊतांनी विचारला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुखाला देशाचे नाव बदलायचे

“बजरंग दल असेल, विश्व परिषद असेल, शेतकरी मेले जे हिंदू नाही का महाराष्ट्र सारख्या प्रगत राज्यांमध्ये 3000 च्या आसपास शेतकरी आत्महत्या करतात आणि या देशावर राज्य करू इच्छिणारे आमचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख यांना या देशाचे नाव बदलायचे आहे. धार्मिक अभिष्टाने करायचे आहेत किंवा बजरंग दलाचे कार्यकर्ते असतील, त्यांना भडकवले जात आहे. इतर काही संघटना आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरती आमचे सरसंघ चालक मोहनराव भागवत कधी बोलले ते दिसले का?” असाही टोला संजय राऊतांनी लगावला.

“शिवसेना हिंदुत्ववादी संघ पक्ष आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्या महागाई, बेरोजगारी हा विषय घेऊन राजकारणात आलो. आम्ही लोकांच्या पोटावर आधी बोलतो. पोटात अन्न नाही आणि हिंदुत्ववाद करत बसले आहेत. महाराष्ट्र हा पेटवायला निघाले आहेत. अशाने या राज्याची राख रांगोळी, हे राज्य नष्ट होईल. छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांचे हे राज्य नष्ट व्हावं हे काही लोकांना सुपारी देऊन भाजपमध्ये पाठवले आहे का? हे कालपर्यंत वीर सावरकरांना शिव्या घालत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेला हाफ चड्डीवाले म्हणून बोलत होते. देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी यांना शिव्या घालत होते. ते आज आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत”, असे संजय राऊत म्हणाले.

“हिंदू मुसलमान याला मटणाचा दुकान वेगळा आणि त्याला मटणाचा दुकान वेगळं. देवेंद्र फडणवीस हे संवेदनशील मुख्यमंत्री असतील तर हे सहन कसे करतात. सर संघचालक यांना जर राष्ट्राची खरी चिंता असेल तर हे सहन कसे करतात”, असाही सवाल राऊतांनी केला.

पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.