'वर्षा'वर फॉर्म्युला जवळपास निश्चित, भाजप आणि मित्रपक्षांना 162 जागा, शिवसेनेला किती?

विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेने (Shiv Sena BJP seat distributions) युतीची घोषणा केली असली, तरी जागावाटपावरुन दोन्ही पक्षात (Shiv Sena BJP seat distributions) धुसफूस सुरु आहे.

'वर्षा'वर फॉर्म्युला जवळपास निश्चित, भाजप आणि मित्रपक्षांना 162 जागा, शिवसेनेला किती?

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेने (Shiv Sena BJP seat distributions) युतीची घोषणा केली असली, तरी जागावाटपावरुन दोन्ही पक्षात (Shiv Sena BJP seat distributions) धुसफूस सुरु आहे. मात्र आता त्यावर तोडगा निघाल्याची चिन्हं आहेत. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि शिवसेना नेते सुभाष देसाई (Subhash Desai) यांची जागावाटपावर रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानुसार शिवसेना 126 तर भाजप आणि मित्रपक्षांना 162 जागा असा प्रस्ताव भाजपने दिल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर ठरलेला हा फॉर्म्युला जवळपास निश्चित मानला जात आहे. भाजप अध्यक्ष अमित शाह 22 तारखेला मुंबईत येणार आहेत. त्यावेळी या जागावाटपांचा फॉर्म्युला जाहीर होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील विधानसभेच्या 288 मतदारसंघांपैकी 18 जागा मित्रपक्षांना सोडल्यानंतर शिवसेना-भाजप युतीचं 135-135 जागा लढवण्याचं सूत्र ठरलं होतं. शिवसेना याआधीपासूनच 50-50 जागांच्या फॉर्म्युल्यावर ठाम होती. पण आता त्यामध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे.

एकीकडे शिवसेना-भाजपमध्ये इनकमिंग सुरुच आहे. त्यामुळे विद्यमान आमदारांसोबतच आयारामांना तिकीट देण्याची तजवीजही भाजपला करावी लागणार आहे. परंतु सर्वांना खुश करण्यासाठी तितक्या जागाच नसतील, तर काय करायचं, या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी युती तोडण्याचा मार्ग काढला जाऊ शकतो.

सत्ता आणि जागा 50-50 : संजय राऊत

शिवसेना आणि भाजप (Shiv Sena BJP) यांच्यातील जागा आणि सत्तावाटपाचा फॉर्म्युला भाजप अध्यक्ष अमित शाह (Amit Shah) यांच्यासमोरच ठरला आहे. त्यानुसार जागा आणि सत्तेमध्ये 50-50 टक्के वाटा सेना-भाजपचा (Shiv Sena BJP) असेल, असं शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यापूर्वी म्हटलं होतं.

लोकसभेवेळी  कोणता फॉर्म्युला ठरला होता?

दरम्यान लोकसभा निवडणुकीवेळी उद्धव ठाकरे, अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 18 फेब्रुवारी 2019 रोजी एकत्र पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा केली होती. त्यावेळी लोकसभेला शिवसेना 23 आणि भाजप 25 जागा लढण्यावर शिक्कामोर्तब झालं होतं.

त्यावेळी शिवसेनेची दुसरी अट होती ती म्हणजे विधानसभेचा फॉर्म्युला. या पुढच्या सर्व निवडणुका शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. विधानसभेलाही निम्म्या निम्म्या जागा लढवल्या जातील. विधानसभा निवडणुकीच्या वेळी मित्रपक्षांशी चर्चा केली जाईल आणि उरलेल्या जागा निम्म्या निम्म्या लढवल्या जातील, असं मुख्यमंत्री म्हणाले. जनता पुन्हा आम्हाला निवडून देईल, त्यामुळे पद आणि जबाबदाऱ्या यांचंही समान वाटप होईल, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं.

संबंधित बातम्या 

जागा आणि सत्ता फिप्टी- फिप्टी, अमित शाहांसमोरच फॉर्म्युला ठरला : संजय राऊत  

युतीचा फॉर्म्युला ठरला, शिवसेनेच्या या तीन अटी भाजपकडून मान्य     

सेना-भाजपमध्ये 50-50 चा फॉर्म्युला ठरला होता, पण… : चंद्रकांत पाटील  

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *