‘ते पांढऱ्या पायाचे जिथे जातात तिथे…’, गुलाबराव पाटलांचा राऊतांना खोचक टोला
गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे, ते जिथे जातात तिथे सर्व काही संपतं असं पाटील यांनी म्हटलं आहे.

मंत्री गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गट आणि खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. गद्दारांना पाडेल असं त्यांनी म्हटलं होतं, मात्र त्यांना उमेदवार देखील मिळाला नाही. आणि जे मिळाले ते निवडून आले नाहीत, खातं देखील उघडलं नाही. आता महापालिका निवडणुकांमध्ये काय करणार आहेत? यांच्यासोबत जे लोक आहेत, ते देखील यांच्यावर नाराज आहेत असा हल्लाबोल गुलाबराव पाटील यांनी केला आहे.
नेमकं काय म्हणाले गुलाबराव पाटील?
गद्दारांना पाडेल असं त्यांनी म्हटलं होतं, मात्र त्यांना उमेदवार देखील मिळाला नाही. आणि जे मिळाले ते निवडून आले नाहीत, खातं देखील उघडलं नाही. आता महापालिका निवडणुकांमध्ये काय करणार आहेत? यांच्यासोबत जे लोक आहेत, ते देखील यांच्यावर नाराज आहेत असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, आगे आगे देखो होता है क्या, आता वेळ काही लांब नाहीये, विधानसभेच्या वेळी गद्दारांना पाडू, अशी भीष्म प्रतिज्ञा करत होते, मफलर मागेपुढे करत होते. हे पांढरे पायाचे आहेत, जिथे जातात तिथे सर्व काही संपतं. जळगावमध्ये देखील पक्षाला हे त्याच स्टेजवर घेऊन आलेले आहेत, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.
राऊत, सुरेश जैन यांच्या भेटीवर प्रतिक्रिया
दरम्यान संजय राऊत यांनी सुरेश जैन यांची भेट घेतली, या भेटीवर देखील गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जो चांगलं काम करतो त्याच्या पाठीमागे सुरेश दादा जैन उभे राहतात. यांनी कितीही लाडीगोडी लावलं तरी त्याचा काही उपयोग होणार नाही, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.
सरनाईक यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया
मुंबईची बोलीभाषा ही हिंदी झाली आहे, असं वक्तव्य प्रतापराव सरनाईक यांनी केलं आहे, यावर देखील गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठी हा आमच्या सर्वांच्या अस्मितेचा भाग आहे. मराठी ही बोलली पाहिजे आणि हिंदी ही आमची राष्ट्रभाषा आहे, प्रताप सरनाईक यांनी त्यांचा विचार मांडला, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.
