AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! राजकारणात पुन्हा मोठा भूकंप? भाजप एकनाथ शिंदेंना देणार मोठा धक्का ? घडामोडींना वेग

राजकारणात आता आणखी एक मोठा भूकंप पहायला मिळण्याची शक्यता आहे. भाजपकडून थेट शिवसेना शिंदे गटाच्या बड्या नेत्याला पक्षप्रवेशाची ऑफर देण्यात आली आहे. त्यामुळे वातावरण तापण्याची शक्यता आहे.

मोठी बातमी! राजकारणात पुन्हा मोठा भूकंप? भाजप एकनाथ शिंदेंना देणार मोठा धक्का ? घडामोडींना वेग
eknath shinde Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 02, 2026 | 4:31 PM
Share

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, लवकरच शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कोरेगाव शहरात प्रथमच पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत शिवसेना संपर्क कार्यालय आणि तीन शाखांचे उद्घाटन पार पडले, यावेळी आमदार महेश शिंदे यांची अनुपस्थिती पाहायला मिळाली. या कार्यक्रमात आमदार महेश शिंदे यांचा फोटो ही वगळल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.  याविषयी आमदार महेश शिंदे यांना अनुपस्थितीबाबत आणि फोटो वगळल्याबाबत विचारले असता “माझे कालचे कार्यक्रम आधीच ठरलेले होते. माझ्या कुटुंबाचे आणि मतदारसंघातील सुमारे ६८ कार्यक्रम एकाच दिवशी होते, ज्यात ४२ विवाह सोहळे आणि इतर सामाजिक कार्यक्रमांचा समावेश होता. त्यामुळे मी तिथे उपस्थित राहू शकलो नाही.” असं त्यांनी म्हटलं आहे.

“राजकारणात कोणीही ताम्रपट घेऊन आलेलं नसतं. मी माझं काम प्रामाणिकपणे करत आहे. जनतेने मला निवडून दिलं आहे आणि साडेतीन वर्षे माझ्या हातात आहेत, तोपर्यंत मी फक्त विकासावर लक्ष केंद्रित करणार आहे. कोणाला फोटो लावायचे आहेत किंवा नाही, यापेक्षा जनतेची कामं होणं जास्त महत्त्वाचं आहे.” जे चौघे-पाच जण तिथे होते, त्यांनी कधीच माझं काम केलं नव्हतं. उलट त्यांनी निवडणुकीत विरोधकांच्या बाजूने काम केलं होतं. त्यामुळे अशा गोष्टींकडे मी फारसं लक्ष देत नाही.” असंही त्यांनी म्हटलं आहे. महेश शिंदे हे शिवसेना शिंदे गटावर नाराज असल्याची चर्चा सुरू आहे.

दरम्यान दुसरीकडे अशी देखील बातमी समोर आली आहे की, भाजपकडून महेश शिंदे यांना पक्षप्रवेशाची ऑफर देण्यात आली आहे. भाजपचे नेते जयकुमार गोरे यांनी याबाबत बोलताना मोठं विधान केलं आहे.  महेश शिंदे हे भाजप विचारसरणीचेच आहेत, त्यांना जर काही त्रास होत असेल तर त्यांनी भाजपमध्ये यावं, आम्ही त्यांचं स्वागतच करू असं जयकुमार गोरे यांनी म्हटलं आहे. साताऱ्यामध्ये महेश शिंदे यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे, असंही यावेळी गोरे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता महेश शिंदे हे भाजपमध्ये प्रवेश करणार का? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर! मित्रपक्षांविरोधात आमदार...
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर? मित्रपक्षांविरोधात आमदारांच्या तक्रारी, बैठकीत नेमकं काय घडलं?
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा शिवाजी पार्कचा दीपोत्सव रद्द
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत आक्रमक
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ...
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ थट्टा-मस्करीचा भाग, नेमकी भानगड काय?
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; वाहतुक कोंडी
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; मोठी वाहतुक कोंडी
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज आता प्रकृती स्थिर, डॉक्टरांनी...
शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणा
Shivsena Hearing : शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणार युक्तीवाद?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची अत्यंत महत्त्वाची बैठक, नेमकं कारण...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बडा नेता शिंदे गटात...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बड्या नेत्याचा समर्थकांसह शिंदे गटात प्रवेशाचा निर्णय
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक कलांमध्ये ट्रम्प यांना मोठा धक्का