Shivsena: वरुण सरदेसाई यांच्यासमोर उस्मानाबादचे शिवसेना आमदार कैलास पाटील यांच्या गौप्यस्फोट, म्हणाले…

कैलास पाटील म्हणाले की -शिवसेनेने आम्हाला ओळख दिली, उमेदवारीचे तिकीट दिले. त्यामुळे आम्ही खुर्चीवर बसू शकलो. सर्वसामान्य जनता व शिवसैनिक यांच्या मतांवर आम्ही आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी झालो आहोत. शिवसेनेने आम्हाला ओळख निर्माण करुन दिली आणि ज्यांनी ओळख दिली त्यांच्याशी कधीही प्रतारणा करायची नाही. असेही पाटील यावेळी म्हणाले. कितीही अमिषे आली तरी आपण आणि खासदार ओमराजे हे शिवसेना सोडणार नाहीत.

Shivsena: वरुण सरदेसाई यांच्यासमोर उस्मानाबादचे शिवसेना आमदार कैलास पाटील यांच्या गौप्यस्फोट, म्हणाले...
काय म्हणाले कैलास पाटील?Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Sep 10, 2022 | 7:39 PM

उस्मानाबाद – उद्धव ठाकरेंची साथ (Uddhav Thackeray)आणि शिवसेना सोडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)गटाकडून आजही वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. असा गौप्यस्फोट उस्मानाबादचे शिवसेनेचे आमदार कैलास पाटील (Kailas Patil)यांनी केला आहे. शिंदे गटाकडून कधी आमिषे, ऑफर देण्यात येत आहेत. तर कधी दबाव टाकून वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत, असे आमदार कैलास पाटील म्हणालेत. मात्र कितीही ऑफर आल्या, दबाव आला तरी शिवसेना सोडणार नसल्याचा खुलासाही आमदार कैलास पाटील यांनी केला. आजही काही सहकारी आमदारांच्यामार्फत निरोप येतात, सगळेच निरोप जाहीर सांगायचे नसतात. असे सांगत त्यांनी काय ऑफर व निरोप दिला जातोय हे गुलदस्त्यात ठेवले आहे.

खासदारांच्या उपस्थितीत गौप्यस्फोट

तुळजापुर येथे युवा सेनेच्या मेळाव्यात बोलताना आमदार कैलास पाटील यांनी हा खळबळजनक गौप्यस्फोट केला यावेळी युवासेनेचे राज्य सचिव वरुण सरदेसाई, खासदार ओमराजे निंबाळकर हे उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर गुवाहाटीला जाताना कैलास पाटील हे रस्त्यातूनच परत आले होते. आपल्याला फसवून नेल्याचा सांगत कैलास पाटील तात्काळ मातोश्रीवर दाखल झाले होते. त्यानंतर या सुटकेची व घटनेची मोठी चर्चा झाली होती. शिवसेनेतील निष्ठावान आजही शिवसेनेच्याच बाजूने असल्याचे सांगताना उध्दव ठाकरे हे नेहमी कैलास पाटील यांचे उदाहरण देतात. त्याच कैलास पाटील यांनी आपल्याला आणखीही ऑफर येत असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे.

हे सुद्धा वाचा

भाषणात काय म्हणाले कैलास पाटील?

शिवसेनेने आम्हाला ओळख दिली, उमेदवारीचे तिकीट दिले. त्यामुळे आम्ही खुर्चीवर बसू शकलो. सर्वसामान्य जनता व शिवसैनिक यांच्या मतांवर आम्ही आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी झालो आहोत. शिवसेनेने आम्हाला ओळख निर्माण करुन दिली आणि ज्यांनी ओळख दिली त्यांच्याशी कधीही प्रतारणा करायची नाही. असेही पाटील यावेळी म्हणाले. कितीही अमिषे आली तरी आपण आणि खासदार ओमराजे हे शिवसेना सोडणार नाहीत. काही नेते जरी सोडून गेले तरी, सामान्य जनता शिवसेनेच्या व उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहे व राहणार असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.