AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ शिंदेंचा पुन्हा उद्धव ठाकरेंना धक्का, शिवसेना शिंदे गटात मोठा पक्षप्रवेश

मोठी बातमी समोर येत आहे, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना शिंदे गटात मोठा पक्षप्रवेश झाल्याचं पहायला मिळत आहे.

एकनाथ शिंदेंचा पुन्हा उद्धव ठाकरेंना धक्का, शिवसेना शिंदे गटात मोठा पक्षप्रवेश
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 10, 2025 | 5:39 PM
Share

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे, येत्या 2 डिसेंबर रोजी नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे, दरम्यान नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या या निवडणुकीसाठी आता सर्वच पक्ष जोमानं तयारीला लागले आहेत, काही ठिकाणी युती आघाडी होण्याचं चिन्ह आहे तर काही ठिकाणी सर्वच पक्ष निवडणुका स्वबळावर लढू शकतता असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र या निवडणुकीपूर्वी आता पक्षांतराला वेग आला आहे. अनेक इच्छुक उमेदवार या पक्षातून त्या पक्षात जाताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यात हा पक्षप्रवेश पार पडला, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत धुळे ,पुणे ,नंदुरबार सह विविध जिल्ह्यातील आणि विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे, मात्र यामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. या पदाधिकाऱ्यांसोबतच  मुंबईतील विक्रोळी, चेंबूर, कांजूरमार्ग, भागातील विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देखील शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.

  शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेले पदाधिकारी 

१) डॉ संजय लारने पाटील – ठाकरे गट धुळे सचिव/प्रवक्ता

२) जीतेंद्र जगताप – ठाकरे गट नगरसेवक-धुळे

३) हेमंत पाटील – माजी गटनेते ठाकरे गट शिरपूर नप, धुळे

४) वसंत पावरा – मा. सभापती जिल्हा परिषद, ठाकरे गट

५) राजेंद्र गिरास – मा नगरसेवक – शिरपूर नप.

६) हेमहराज राजपूत शहराध्यक्ष, राष्ट्रवादी शरद पवार गट

७)  राजेश फड – मा. जिप सदस्य- परभणी

८) प्रथमेश चव्हाण – मनसे माथाडी उपाध्यक्ष

९) गोपीनाथ संसारे

१०) विनोद जगताप- ठाकरे गट, शहर संघटक – धुळे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...