“निवडणूक जवळ येईल तसं मविआचे अनेक लोकं संपर्कात”; भाजप नेत्यानं ठाकरे गटातील चलबिचल सांगितली

महादेव कांबळे, Tv9 मराठी

|

Updated on: Jan 31, 2023 | 11:24 PM

राम शिंदे यांनी महाविकास आघाडीवर टीका करताना महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर मनामध्ये चल बिचल सुरू आहे ते सत्तेविना राहू शकत नाहीत.

निवडणूक जवळ येईल तसं मविआचे अनेक लोकं संपर्कात; भाजप नेत्यानं ठाकरे गटातील चलबिचल सांगितली

अहमदनगरः निवडणुका जस जशा जवळ येतील तस तशा राजकीय हालचालींना प्रचंड वेग येतो. सध्या राज्यातीलही राजकीय परिस्थिती तशीच असल्याने शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या जोरदार शाब्दिक चकमकी सुरू आहेत. शिंदे गटाकडून ठाकरे गटावर टीका केली जात असताना त्यांच्या पक्षातील नेते आपल्या गटाकडे येण्यासाठी कसे आतूर आहेत ते सांगितलं जात आहे. त्याबाबतच आमदार राम शिंदे यांनी ठाकरे गटातील अनेक नेते आपल्या गटात येण्यास उत्सुक असून हे नेते थोड्याच दिवसात आपल्या पक्षात येतील असा दावाही शिंदे गटातील नेत्यांकडून केला जात आहे.

यावेळी आमदार राम शिंदे यांनी सांगितले की, महाविकास आघाडीचे लोकं आपल्या पक्षाच्या संपर्कात असून जसजशी निवडणूक जवळ येईल तसे अनेक लोक त्यांना सोडून भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटामध्ये दिसतील असा दावा भाजप प्रवक्ते आणि आमदार राम शिंदे यांनी केला आहे.

राम शिंदे यांनी महाविकास आघाडीवर टीका करताना महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर मनामध्ये चल बिचल सुरू आहे ते सत्तेविना राहू शकत नाहीत.

त्यामुळे त्यांना मिळाली कशीबशी सत्ता आली होती ती पण निघून गेली अशी टीका राम शिंदे यांनी केली आहे. तसेच शिंदे-फडणवीस सरकार जून महिन्यापासून अतिशय चांगलं काम करत आहे.

तर ठाकरे गटातील नेते महाविकास आघाडी आपल्याला तारू शकत नाही असं महाविकास आघाडीच्या सदस्यांचे मत असल्याचेही त्यांनी सांगितले. या सर्व प्रकारामुळे महाविकास आघाडीतील चलबिचल वाढत चालली असल्याचेही राम शिंदे यांनी सांगितले.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI