AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवाजी विद्यापीठाचा क्रांतिकारी निर्णय; महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील 865 मराठी भाषिक गावातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण

कोल्हापूरः महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद गेल्या कित्येक वर्षांपासून चालू आहे. 1956 सालापासून कर्नाटक राज्याच्या सीमा वाढवण्यासाठी विजापूर, धारवाड, गुलबर्गा, बिदर यासह बेळगाव जिल्ह्याचा कर्नाटक राज्यात समावेश करण्यात आला. त्यावेळी भाषावार प्रांतरचना लक्षात न घेता बेळगाव कर्नाटकात घेतले गेल्यामुळे सीमाभागात (Maharashtra Karnataka Borderism) या निर्णयाला तीव्र विरोध करण्यात आला. तेव्हापासून ते आजतागायत मराठी भाषिक जनतेचा सीमाप्रश्नाचा लढा अविरत […]

शिवाजी विद्यापीठाचा क्रांतिकारी निर्णय; महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील 865 मराठी भाषिक गावातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण
| Updated on: Jul 27, 2022 | 3:04 PM
Share

कोल्हापूरः महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद गेल्या कित्येक वर्षांपासून चालू आहे. 1956 सालापासून कर्नाटक राज्याच्या सीमा वाढवण्यासाठी विजापूर, धारवाड, गुलबर्गा, बिदर यासह बेळगाव जिल्ह्याचा कर्नाटक राज्यात समावेश करण्यात आला. त्यावेळी भाषावार प्रांतरचना लक्षात न घेता बेळगाव कर्नाटकात घेतले गेल्यामुळे सीमाभागात (Maharashtra Karnataka Borderism) या निर्णयाला तीव्र विरोध करण्यात आला. तेव्हापासून ते आजतागायत मराठी भाषिक जनतेचा सीमाप्रश्नाचा लढा अविरत सुरूच आहे. कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या (Shivaji University Kolhapur) हीरकमहोत्सवानिमित्त आणि स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र-कर्नाटक या राज्यांच्या सीमाभागातील मराठी भाषिक विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण (Free education) देण्याचा निर्णय शिवाजी विद्यापीठाने हीरमहोत्सवी वर्षात घेतला आहे.

सीमाभागातील मराठी बांधवांना साथ देण्यासाठी शिवाजी विद्यापीठाने आता महाराष्ट्राने दावा केलेल्या 865 गावातील विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने विविध प्रकारच्या शिक्षणा दारे खुली केली आहेत. याचा सीमाभागातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहनही आता विद्यापीठाकडून करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांसाठी नवी योजना

शिवाजी विद्यापीठाने सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी लागू केलेल्या योजनाची माहिती देण्यासाठी मंगळवारी तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन येते मार्गदर्शन कार्यक्रम करण्यात आला आहे. या कार्यक्रमामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागातील प्रा. डॉ. नंदकुमार मोरे, राज्यशास्र विभागाच्या डॉ. भारती पाटील यांनी मार्गदर्शन केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी काही तरी करावे हा विचार शिवाजी विद्यापीठ करत होते. त्यामुळेच विद्यापीठात 60 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल एक नवीन योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

अनुदानीत अभ्यासक्रमांना मोफत प्रवेश

सीमाभागातील 865 गावातील विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापीठाच्या आवारात शिकवल्या जाणाऱ्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा लाभ घेता येणार आहे. विद्यापीठात शिकवल्या जाणाऱ्या अनुदानीत अभ्यासक्रमांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. तर इतर अभ्यासक्रमांच्या शुल्कात 25 टक्के सवलत दिली जाणार आहे. मोफत वसतिगृहाची सोय असेल मात्र त्यांना जेवणाचा खर्च स्वतःहून करावा लागणार आहे. त्यासाठी कमवा आणि शिका योजनेचाही लाभ घेता येणार आहे.

सीमावादामुळे शिक्षणावरही खोलवर परिणाम

या योजनेविषयी शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागातील भाषा अभ्यासक प्रा. डॉ. नंदकुमार मोरे यांनी सांगितले की, सीमाभागीतली ८६५ गावातील विद्यार्थ्यांसाठी शिवाजी विद्यापीठाने महत्वाकाशी योजना सुरु केली आहे. गेली 65 वर्षे दोन्ही राज्यांच्या या वादात या 865 गावातील विद्यार्थी भरडले जात आहेत. त्यामुळे मराठी भाषिक विद्यार्थ्यांच्या शिक्षण क्षेत्रावरही त्याचे खोलवर पडसाद उमटले आहेत. त्यामुळेच या भागातील मुलामंध्ये शिक्षणाविषय अनास्था निर्माण झाली आहे आणि ही अनास्थाच त्यांच्या शैक्षणिक आयुष्यावर आणि जीवनमानावर त्याचा परिणाम करत आहे. त्यामुळेच शिवाजी विद्यापीठाने सीमाभागातील विद्यार्थ्यांचे जीवन मान उंचवावे, विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आस्था वाढावी हे उच्च ध्येय डोळ्यासमोऱ ठेऊन कुलगुरू डी. टी. शिर्के यांनी विद्यापीठातील अनुदानीत विभागामध्ये मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सीमाभागातील विद्यार्थ्यांना ही नामी संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

खास मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन

या योजनेतील प्रवेश प्रक्रियेची माहिती देण्यासाठी बेळगाव व बिदर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी 26 जुलै ते 4 ऑगस्टपर्यंत सकाळी 11 वाजता खास मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.