AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘सरकारने ईडब्ल्यूएसचे आरक्षण दिलं नाही तर शिवसंग्राम कोर्टात जाणार’

जे नुकसान झालं त्याला सरकारची निष्क्रियता आणि सरकारमधील काही मराठा समाज्याचे मंत्री यांच्यामुळे ही वेळ आल्याचा आरोप संग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केला आहे.

'सरकारने ईडब्ल्यूएसचे आरक्षण दिलं नाही तर शिवसंग्राम कोर्टात जाणार'
| Edited By: | Updated on: Nov 22, 2020 | 6:27 PM
Share

रत्नागिरी : मराठा आरक्षणावरून (Maratha reservation) शिव संग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी थेट सरकारला इशारा दिला आहे. जर मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएसचं आरक्षण दिलं नाही तर शिवसंग्राम (ShivSangram) कोर्टात जाईल असा इशारा विनायक मेटे यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी सरकार आणि काही नेत्यांवरही टीका केली. मराठा आरक्षण स्थगितीचा फटका मेडिकल प्रवेशावर झाला आहे. यामुळे आर्थिक मागास दुर्बल घटकाचे म्हणजेच ईडब्ल्यूएसचे राज्य सरकारकडून आरक्षण मिळावे ही मागणी समोर येत आहे. (ShivSangram will go to court if the government does not give reservation for EWS warned by Vinayak Mete)

जर हे आरक्षण दिलं असतं तर मराठा समाज्याची जवळपास 600 मुलं मेडिकल प्रवेशापासून वंचित राहिली नसती. जे नुकसान झालं त्याला सरकारची निष्क्रियता आणि सरकारमधील काही मराठा समाज्याचे मंत्री यांच्यामुळे ही वेळ आल्याचा आरोप संग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केला आहे. यावेळी सरकारने जर ईडब्ल्यूएसचे आरक्षण दिलं नाही तर शिवसंग्राम कोर्टात जाईल असा इशाराही विनायक मेटे यांनी दिला आहे.

विजय वड्डेटीवारांवर टीका

ओबीसी आणि मराठा समाजात तेढ कशी निर्माण होईल हे पाहण्याचे काम सत्ताधारी पक्षातले आणि सरकारमधील काही मंत्री करत असल्याचा आरोपही विनायक मेटे यांनी केला आहे. जे आऊटडेटेड झालेले नेते आहेत त्यांना पुढे करून सरकारमधील विजय वडेट्टीवारांसारखे नेते हे काम करत असल्याचा थेट आरोप विनायक मेटे यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.

वीज बिलावरून सरकारवर आरोप

वाढीव वीज बिल देऊन सरकारने सर्वसामान्यांच्या खिशावर डाका घातला याचा आम्ही निषेध करतो. शंभर युनिट वीज आम्ही मोफत देवू असं आश्वासन देण्यात आलं होतं. ही घोषणा लांबच राहिली मात्र, अशा पद्धतीने वाढीव वीज बिल देणं अतिशय चुकीचं असल्याचं विनायक मेटे यांनी म्हटलं आहे. ते पुढे म्हणाले की, ‘गोरगरिबांनी वीज वापरलीच नाही. त्यांना मात्र, भरमसाट बिलं पाठवली आणि जे मंत्री भरमसाट वीज वापरतात त्यांना वीज बिल नाही’ हा दुजाभाव सरकार करत असल्याचा आरोप विनायक मेटे यांनी केलाय. तसेच या प्रकरणी शिवसंग्रामसुद्धा आंदोलन छेडणार असल्याचा इशारा विनायक मेटे यांनी दिला आहे. या बाबत दोन दिवसांत उर्जा मंत्र्यांशी आमची बैठक असल्याची माहिती विनायक मेटे यांनी दिली. (ShivSangram will go to court if the government does not give reservation for EWS warned by Vinayak Mete)

‘गोंधळलेलं सरकार’

कोरोनाची दुसरी लाट येऊ नये यासाठी सरकारडून सूचना करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे कोव्हिड सेंटर्स बंद करण्याचा सपाटा महाविकास आघाडी सरकारने लावला आहे. म्हणजे सरकारचं काय चाललं आहे हेच कळंत नाही. धोरण निश्चित नाही, निर्णय निश्चित नाही, त्यावरील अंमलबजावणी नाही. त्यामुळे हे गोंधळलेलं सरकार असल्याची टिका शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी केली आहे.

इतर बातम्या – 

Chandrakant Patil | मराठा महिलेला खरंच मुख्यमंत्री करणार का? चंद्रकांत पाटील म्हणतात….

शेलार काल म्हणाले, कर्तृत्त्ववान मराठा स्त्री मुख्यमंत्री व्हावी, आज म्हणाले, आमचं सरकार आल्यास मुख्यमंत्रिपदी…..

(ShivSangram will go to court if the government does not give reservation for EWS warned by Vinayak Mete)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.