‘सेनेचा मुख्यमंत्री शपथ घेताना स्टेजसमोर बसू द्या’, शेतकऱ्याची मागणी, उद्धव म्हणाले पत्ता द्या, स्टेजवर जागा देतो!

"शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेत असताना स्टेजसमोर मला जवळ उभं करा" अशी विनंती यावेळी संजय सावंत यांनी उद्धव ठाकरे यांना केली.

‘सेनेचा मुख्यमंत्री शपथ घेताना स्टेजसमोर बसू द्या’, शेतकऱ्याची मागणी, उद्धव म्हणाले पत्ता द्या, स्टेजवर जागा देतो!

सांगली : शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून सांगली जिल्ह्यातील शेतकरी पाच दिवस निरंकार उपवास करत 85 किलोमीटर अनवाणी पायाने  (Uddhav Thackeray wet drought) पत्नीसह विठ्ठल दर्शनाला पंढरपूरला गेले. संजय सावंत आणि रुपाली सावंत असं या शेतकरी दाम्पत्याचं नाव आहे. पंढरपूरला गेलेल्या संजय सावंत यांनी उद्धव ठाकरे यांची भेट (Uddhav Thackeray wet drought) घेतली.

सावंत यांनी उद्धव ठाकरे यांना पंढरपूरमधून आणलेली तुळशीची माळ आणि चंद्रभागेमधील तीर्थ भेट दिले.

“शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेत असताना स्टेजसमोर मला जवळ उभं करा” अशी विनंती यावेळी संजय सावंत यांनी उद्धव ठाकरे यांना केली. त्यावर उद्धव ठाकरे यांनी तुमचा संपर्क क्रमांक द्या, मी तुम्हाला शपथविधी सोहळ्यात स्टेजवर उभं करतो, असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी संजय सावंत यांना (Uddhav Thackeray wet drought) दिलं.

उद्धव ठाकरे ओला दुष्काळ दौरा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे ओल्या दुष्काळामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी करत आहेत. सातारच्या माण-खटाव मतदारसंघातील मायणी इथल्या शिवाजी देशमुख या शेतकऱ्याचं पावसामुळे द्राक्ष शेतीचं मोठे नुकसान झाले. याची पाहणी उद्धव ठाकरे यांनी केली.

“मी पाहणी करण्यासाठी आलो आहे, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आलो आहे. एका भागात जर एवढे नुकसान झाले असेल तर राज्यात किती नुकसान झाले असेल? सातबारा कोरा करण्याचं वचन शिवसेना पूर्ण करणार”, असं आश्वासन यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिलं.

शिवसेना शेतकऱ्यांसाठी मदत केंद्रे सुरू करणार असून, तुम्ही खचून जाऊ नका आणि आत्महत्येचा विचारही मनात आणू नका, शिवसेना तुमच्या पाठीशी आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मी मुख्यमंत्रिपदासाठी आलेलो नाही, मी तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान राज्यात सध्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये एकत्र येऊन आघाडी करण्याबाबत वाटाघाटी सुरु आहेत. सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. लवकरात लवकर सत्तास्थापन करुन अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी मतदार धावा करत आहेत. तसेच दुसरीकडे राज्यातील बडे नेते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भेट देत आहे.

राज्यात सध्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या शिफारशीनंतर राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. सत्तास्थापन करण्यात  मोठे पक्ष असमर्थ ठरल्याने राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली. त्यानंतर 12 नोव्हेंबर संध्याकाळी साडेपाच वाजल्यापासून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे.

Published On - 6:17 pm, Fri, 15 November 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI