AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ शिंदेंनी ‘त्या’ नेत्याला दिलेला शब्द पाळला, विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकासाठी अखेर शिवसेनेकडून नाव जाहीर

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी २७ मार्च रोजी पोटनिवडणूक होत आहे. भाजपने संजय केणेकर, दादाराव केचे आणि संदीप जोशी यांना उमेदवार म्हणून घोषित केले आहे. शिवसेना (शिंदे गट) ने चंद्रकांत रघुवंशी यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे उमेदवार अजून जाहीर झाले नाहीत.

एकनाथ शिंदेंनी 'त्या' नेत्याला दिलेला शब्द पाळला, विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकासाठी अखेर शिवसेनेकडून नाव जाहीर
| Updated on: Mar 17, 2025 | 10:19 AM
Share

विधानपरिषदेच्या रिक्त झालेल्या पाच जांगासाठी येत्या 27 मार्चला पोटनिवडणूक होत आहे. या जागांसाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजप तीन, शिवसेना शिंदे व राष्ट्रवादी अजित पवार गटाला प्रत्येकी एक जागा दिली जाणार आहे. यानुसार, काल भाजपकडून विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी उमेदवार घोषित करण्यात आले. यात संजय केणेकर, दादाराव केचे आणि संदीप जोशी या तिघांचा समावेश आहे. यानंतर आता विधानपरिषदेच्या एका जागेसाठी शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून एक नाव जाहीर करण्यात आले आहे. शिवसेनेचे संपर्क प्रमुख आणि माजी विधानपरिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांना पुन्हा विधानपरिषदेवर पाठवलं जाणार आहे.

शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या वाट्याला विधानपरिषदेची एक जागा आली आहे. यासाठी अनेकजण इच्छुक होते. मात्र यात धुळे–नंदुरबारचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संपर्क प्रमुख आणि माजी विधानपरिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांचं नाव आघाडीवर होते. त्यासोबतच शीतल म्हात्रे, संजय मोरे, किरण पांडव यांचीही नाव चर्चेत होती. अखेर आता चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पाळला, असे बोललं जात आहे.

विधानपरिषदेतील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सदस्य आमश्या पाडावी हे अक्कलकुवा मतदार संघातून विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे पाडवी यांची विधानपरिषदेतील जागा रिक्त झाली होती. सव्वातीन वर्ष कार्यकाळ बाकी असलेल्या या जागेसाठी विधान परिषदेची निवडणूक होत आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना संधी देण्यात आली आहे.

कोण आहेत चंद्रकांत रघुवंशी?

  • चंद्रकांत रघुवंशी हे 1992 पासून काँग्रेस पक्षात सक्रीय राजकारणात आहेत.
  • चंद्रकांत रघुवंशी 1992 मध्ये जिल्हा परिषदेचे सदस्य होऊन धुळे व नंदुरबार जिल्हा एकत्रित असताना सहा वर्षे धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते.
  • त्यानंतर सलग तीनवेळा ते विधानपरिषदेचे सदस्य आहेत.
  • आमदारकीची मुदत एप्रिल 2020 मध्ये पूर्ण होणार होती. मात्र तत्पूर्वीच त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि ऑक्टोबर २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.
  • त्यानंतर जुलै २०२२ रोजी त्यांनी एकनाथ यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.

कोणत्या पक्षाकडून कोणाला संधी?

भाजपा

1) संजय किणीकर- संभाजीनगर

2) दादाराव केचे- वर्धा

3) संदीप जोशी – नागपूर

शिवसेना

1) चंद्रकांत रघुवंशी- नंदुरबार

राष्ट्रवादी कांग्रेस (अजून जाहीर नाही)

संभाव्य 1) उमेश पाटील 2) झिशान सिद्दीकी

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.