संजय राऊतांच्या घरी लगीनघाई ! लेकीचं हास्य टिपण्यासाठी ‘किंगमेकर’ बनला फोटोग्राफर

महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी मोलाची भूमिका बजावणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नाची सध्या लगबग सुरु आहे. राऊत कुटुंब या आनंदसोहळ्यात दंग आहे. सध्या संजय राऊत आणि त्यांची मुलगी पूर्वशी यांच्यातील अल्लड नात्याची झलक पाहायला मिळाली आहे.

संजय राऊतांच्या घरी लगीनघाई ! लेकीचं हास्य टिपण्यासाठी 'किंगमेकर' बनला फोटोग्राफर
SANJAY RAUT

मुंबई : प्रत्येक बापासाठी आपल्या लेकीचं लग्न खास अन् प्रत्येक लेकीसाठी आपला बाप ‘किंग’च असतो. तिच्यासाठी तो एक पर्वताएवढा आधारही असतो. पण अशा कणखर पर्वतालासुद्धा हळवं मन असतं. बाप-लेकीच्या अशाच अलवार नात्याची झलक राजकारणातील किंगमेकर आणि त्यांच्या लेकीमध्ये दिसून आलीय. महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी मोलाची भूमिका बजावणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नाची सध्या लगबग सुरु आहे. राऊत कुटुंब या आनंदसोहळ्यात दंग आहे. सध्या संजय राऊत आणि त्यांची मुलगी पूर्वशी यांच्यातील अल्लड नात्याची झलक पाहायला मिळाली आहे.

लेकीच्या लग्नासाठी राऊतांची लगबग

बापासाठी लेकीचं लग्न म्हणजे ओठांवर हास्य ठेवून डोळ्यांच्या ओलावणाऱ्या कडा हळूच लपवण्याचा प्रसंग. तिच्या लहानपणापासूनच्या प्रत्येक आठवणीत हरवण्याचा क्षण. सध्या राऊत कुटुंबीयही हास्य आणि आनंदाच्या अशाच सोनेरी क्षणात रंगून गेले आहे. हा लग्नसोहळा महाराष्ट्रातल्या ‘किंगमेकर’च्या घरातला. संजय राऊत आपल्या लेकीच्या लग्नाची तयारी करण्यात दंग झाले आहेत. आपल्या लाडक्या प्रिन्सेसच्या लग्न सोहळ्यात कशाचीही कमी पडू नये याची राऊत खबरदारी घेत आहेत. राऊत यांच्या मुलीचं म्हणजे पूर्वशीचं लग्न येत्या 29 तारखेला आहे. लग्नाआधीच्या मंगल विधी, संगीत यासाठी हे कुटुंबीय पवईतील रेनेसां या सप्ततारांकित हॉटेलमध्ये एकत्र जमलेत.

राऊतांची लेकीला मिठी, चेहऱ्यावर आनंद अन् समाधान

एखादा महालात राहणारा कुबेर असो किंवा झोपडीत राहणारा एखादा गरीब बाप. या दोघांसाठीही त्याची लेक म्हणजे दुसरी परीच असते. तळहाताच्या फोडासारखं जपून लाडात वाढवून तिला सासरी पाठवणं म्हणजे मोठं अवघड काम. लग्न झाल्यानंतर आपली पोर सासरी जाणार म्हटल्यावर बाप तिचे सर्व हट्ट, लाड पुरवण्याचा प्रयत्न करत असतो. सध्या राजकाणातील मुसद्दी नेता म्हणून ओळख असलेले राऊतही आपल्या लेकीचा हट्ट पुरवण्यात तिचा लाड करण्यात व्यस्त आहेत. ते आपल्या मुलीला आनंदाने मिठीत घेताना दिसत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य अगदी स्पष्टपणे दिसत आहे.

पोरीचं हसू कॅमेऱ्यात कैद करण्यात राऊत दंग 

एवढंच नाही तर संजय राऊत आपल्या मुलीच्या चेहळ्यावरील हा आनंद आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद करण्यात दंग झाले आहेत. लेक बसलेली असता कसलाही संकोच न बाळगता राऊत पूर्वशीचा फोटो काढत आहेत. लेकीचं हसू पाहून त्यांचही मन ओथंबल्याचं दिसतंय.

लग्नााला कोण कोण येणार ?

दरम्यान, राऊत यांच्या मुलीचे लग्न येत्या 29 तारखेला असल्यामुळे सध्या ते व्यस्त आहेत. या लग्नात कोणकोणते राजकीय मंडळी येणार तसेच कोणत्या खास पाहुण्यांना आमंत्रण असणार हे पाहणं समस्त महाराष्ट्रासाठी उत्सूकतेचं ठरणार आहे.

इतर बातम्या :

पाणीपुरवठा बंद असल्याने आज नाशिककरांची निर्जळी; उद्याही कमी दाबाने पाणी, जलवाहिन्यांची दुरुस्ती सुरू

साहित्य संमेलनाचा यथासांग राजकीय कार्यक्रम; मुख्यमंत्र्यांच्या हजेरीसह नेते आणि मंत्र्यांची फळीच व्यासपीठ गाजवणार

‘साखरेला चांगले दिवस, ऊसाला 3700 रुपये भाव द्या’, राजू शेट्टींची नाशिकमधून मागणी; एसटी कर्मचाऱ्यांनाही महत्वाचा सल्ला


Published On - 6:29 pm, Sat, 27 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI