Vinayak Raut | ‘Sindhudurg जिल्ह्यातील राजकीय हत्या कुणी पचवल्या?’
मुलांच्या उपद्व्यापामुळे त्रास होत असेल, म्हणून भूतकाळ आठवत नसेल, अशी टीका शिवसेना (Shivsena) नेते विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर केलीय.
कालच्या ट्विट वरून मनात आता संशय येतोय, की दुसऱ्यावर खुनाचे आरोप करताना त्यांना कदाचित वाढत्या वयामुळे विसमरण होत असावे. मुलांच्या उपद्व्यापामुळे त्रास होत असेल, म्हणून भूतकाळ आठवत नसेल, अशी टीका शिवसेना (Shivsena) नेते विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर केलीय. सिंधुदुर्गामध्ये त्यांच्या कारकिर्दीत खून, दरोडे, खंडणीचे 9 वर्षं प्रकार झाले होते. अंकुश राणे, मंचेकर, सत्यजित भिसे यांचे खून कोणी केले, कशा पद्धतीने सुचवले, श्रीधर नाईक यांच्या खुनात आरोपी कोण होतं सूत्रधार कोण, हे सांगायची गरज नाही. दुसऱ्यावर खुनाचे आरोप करताना त्यांना कदाचित वाढत्या वयामुळे विसमरण होत असावे, असा टोला विनायक राऊत यांनी लगावला आहे. सेनेच्या लाव रे तो व्हिडिओ अंतर्गत भाजपाच्या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राणेंवर आरोप करण्यात आल्याचा व्हिडिओ दाखवण्यात आला. आता याप्रकरणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे चौकशीची मागणी करणार असल्याचे राऊत म्हणाले.
Latest Videos
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा

