AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : आम्हाला गोळ्या झाडाल, आमची हत्या कराल, करा, संजय राऊत का संतापले?

मुंबईसह, संपूर्ण महाराष्ट्र अदानींच्या घशात घालण्यासाठीच राज्यातलं सरकार गैरमार्गाने विजयी करण्यात आलंय. इतक्या मोठ्या उद्योगपतीला जकातनाकेही चालवायचे आहेत. यांची लायकी बघा, असं म्हणत राऊतांनी अदानींवर टीका केली.

Sanjay Raut : आम्हाला गोळ्या झाडाल, आमची हत्या कराल, करा, संजय राऊत का संतापले?
संजय राऊतांचा अदानींवर हल्लाबोल
| Updated on: Dec 11, 2024 | 10:34 AM
Share

विधानसभेच्या निकालानंतर 20 दिवसानंतरही जर मंत्रीमंडळाची स्थापना होत नसेल, गृहखातं कोणाकडे आहे हे ठरत नसेल तर या राज्यातल्या कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण होतोयं. राज्यातली कायदा सुव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. बीडच्या केजमध्ये सरपंचाची हत्या, आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचा खून असे अनेक गुन्हे समोर आहेत.  पराभूत झालेले आमदार जे भाषा वापरतात ती ऐकून गुंडसुद्धा शरमेनं मान खाली घालतील.

दिवसाढवळ्या  लोकाचं अपहरण होतंय, हत्या होतंय, सतीश वाघसारख्या उद्योजकाला मारलं जात असेल तर आणि पोलीसप्रमुख खासदारांचा फोन उचलत नसतील तर ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. देवेंद्र फडणवीस यांना हे राज्य अशाप्रकारेच चालवायचं आहे का ?  हे त्यांनी एकदा स्पष्ट करावं, म्हणजे आम्ही त्यांना त्या प्रकारे उत्तर देऊ, असे राऊत म्हणाले. आम्ही रस्त्यावर उतरू आमच्यावर गोळ्या झाडाल, आम्हाला तुरूंगात टाकाल, बाकी काय कराल ? आमची तयारी आहे अशा शब्दांत राऊतांनी माध्यमांशी संवाद साधताना संताप व्यक्त केला.

अदानी-फडणवीस भेटीवर टीका

मुंबईसह, संपूर्ण महाराष्ट्र अदानींच्या घशात घालण्यासाठीच राज्यातलं सरकार गैरमार्गाने विजयी करण्यात आलंय. इतक्या मोठ्या उद्योगपतीला जकातनाकेही चालवायचे आहेत. यांची लायकी बघा. जगातला सगळ्या श्रीमंत माणूस, नरेंद्र मोदींचा मित्र आहे हा, याला आता महाराष्ट्रातले टोलनाकेही चालवायचे आहेत. म्हणजे कोणत्या स्तरापर्यंत ओरबाडणं सुरू झालंय. जकातनाके हे चालवणार, विमानतळ हे चालवणार, भाजीची दुकानं हे चालवणार, मार्केट असो किंवा संसद हे चालवणार, आता जकातनाक्यापर्यंत तुम्ही लुटायाला आले आहात आणि त्यावर आम्ही आवाज उठवायचा नाही, अशा शब्दांत शिसवेना खासदार संजय राऊत यांनी अदानींवर हल्लाबोल चढवला. देवेंद्र फडणवीस काल अदानींना भेटले, त्यानंतरच आमच्या लक्षात आलं की महाराष्ट्राचा काही लचका तुटणार आहे. आणि तोच आता जकातनाक्याच्या रुपाने आम्ही पाहतोय,  राऊत यांनी अदानी-फडवणीसांच्या भेटीवरही टीका केली.

कोण आहेत गौतम अदानी ? याआधीदेखील जकातनाके महाराष्ट्रात चालवेत, ते आता अडानींनाच का ? तुम्ही कोणाच्या दबावाखाली काम करताय ? अदानींना हा संपूर्ण महाराष्ट्र गिळता यावा म्हणून तुम्ही गैरमार्गाने सत्ता स्थापन केली, असा आरोपही संजय राऊतांनी केला.

ऑपरेशन लोटस नव्हे ऑपरेशन डर

विधानसभेतील पराभवानंंतर मविआचे काही खासदार हे भाजपच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे, त्यासंदर्भातही राऊतांना प्रश्न विचारण्यात आला. भारतीय जनता पक्षाकडे पैसे आहेत, यंत्रणा आहेत, ते असं कोणतंही आपरेशन करू शकतात. दहशत निर्माण करून अशाप्रकारे त्यांनी यापूर्वीही माणसं फोडली आहेत.  एकनाथ शिंदे किंवा अजित पवारांसारखी माणसं का पळून गेली, भीतीपोटीच ना… हे ऑपरेशन लोटस नव्हे ऑपरेशन डर होता, असा टोला राऊतांनी लगावला.   नैतिकता नावाचा कोणताही प्रकार भारतीय जनता पक्षाच्या सत्तेत मला जिसत नाही, असेही राऊत म्हणाले.

Follow Us
गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?-जरांगे
Manoj Jarange Patil | गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?
मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
Mumbaicha Raja 2026 | मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला;
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला; म्हणाले, 'वातावरण खराब होऊ नये...
महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम!
Mahendra Thorave | महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम! महेंद्र थोरावेंचा राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल
हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
Ratnagiri Ganeshotsav | हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला
Rajapur | राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला; अपघातात 8 ते 10 जण गंभीर जखमी, नेमकं घडलं काय?
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी...
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी प्रकरणात एकाला अटक
भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
Bhopal | भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! जरांगेंचं भाजपला आव्हान
Manoj Jarange Patil | मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! मनोज जरांगेंचं भाजपला थेट आव्हान; बावनकुळेंवरही केले गंभीर आरोप
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे..
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे आश्वासन