कोकणात जाणाऱ्या प्रत्येकांची आरटीपीसीआर टेस्ट करा, विनायक राऊतांची मागणी

लोकल ट्रेनने प्रवास करण्याचा मूर्खपणा करणाऱ्यांना त्यांच्या नेत्यांनीच शहाणपणा शिकवावा, असा टोलाही राऊतांनी लगावला.  (Vinayak Raut on Maharashtra Corona)

कोकणात जाणाऱ्या प्रत्येकांची आरटीपीसीआर टेस्ट करा, विनायक राऊतांची मागणी
सिंधुदुर्गातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला एनएमसीची मान्यता

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे मुंबईकरांनी सावध राहावे. सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. तेव्हाच कोरोना रोखता येईल. तसेच या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या प्रत्येकांची आरटीपीसीआर टेस्ट करणं बंधनकारक करावं. यासाठी विशेष मोहिम राबवावी, अशी मागणी खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. (Vinayak Raut on Maharashtra Corona Update)

प्रत्येकांची आरटीपीसीआर टेस्ट करणं बंधनकारक

मुंबईसह महाराष्ट्रात कडक निर्बंध लागू करण्याची गरज आहे. त्यामुळे परदेशातून येणार विमान सेवा बंद करावी. तसेच दिल्ली, मुंबईत रुग्णांची संख्या जास्त आहे. तसेच बेफिकिरपणे चाकरमान्यांनी कोकणात जाणं धोकादायक आहे. याचा त्रास तिथल्या आरोग्य यंत्रणांवर पडेल. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रत्येकांची आरटीपीसीआर टेस्ट करणं बंधनकारक असावं. त्याशिवाय लसीकरण गरजेचे करावे. त्याशिवाय गावात प्रवेश देऊ नये. यासाठी विशेष मोहिम राबवली पाहिजे, असेही विनायक राऊत म्हणाले.

अधिकाधिक लस द्या, केंद्राकडे मागणी 

कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता केंद्र सरकार निर्णय घेईल ही अपेक्षा आहे. काही जण बकवासगिरी करतात. तोंड दिलंय त्याचा दुरुपयोग करायचा. यामुळे कोरोना वाढला आहे. लोकल ट्रेनने प्रवास करण्याचा मूर्खपणा करणाऱ्यांना त्यांच्या नेत्यांनीच शहाणपणा शिकवावा, असा टोलाही राऊतांनी लगावला.

मुख्यमंत्र्यांनी आधीच सांगितलंय की मास्क घाला, पण तरीही काही नेते ते करत नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे छान काम करत आहेत. त्यांनी अधिकाधिक लस द्या, अशी मागणी केंद्राकडे केली आहे, असेही विनायक राऊत म्हणाले.

राज्यात 24 तासांत 49 हजार नवे रुग्ण

दरम्यान, दरम्यान राज्यात 3 एप्रिल रोजी एका दिवसात कोरोनाचे तब्बल 49447 नवे रुग्ण आढळले. तसेच तीन एप्रिलला दिवसभरात तब्बल 277 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यापासून 3 एप्रिलला दिवसभरात प्रथमच कोरोना रुग्ण 50 हजाराच्या जवळपास गेले. या आकडेवारीमुळे राज्य सरकार तसेच आरोग्य विभाची डोकेदुखी वाढली असून लॉकडाऊन लागू करण्याबाबत राज्य सरकारकडून विचार केला जात आहे.

राज्यातील मुंबई, पुणे यांसारख्या शहरांत कोरोनानं अक्षरशः कहर केला आहे. शनिवारी कोरोनाचे 9,090 रुग्ण सापडल्याची माहिती मुंबई महापालिकेनं दिली आहे. मुंबईत सद्यस्थितीत 62 हजार 187 कोरोना सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून निर्बंध लावण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  (Vinayak Raut on Maharashtra Corona Update)

संबंधित बातम्या :

Maharashtra Lockdown | मुंबईत लॉकडाऊन करणार का? किशोरी पेडणेकर म्हणतात…

Lockdown: लोक बेफिकीर; भाजपच्या नेत्यांना लोकांच्या जीवाशी देणघेणं नाही; नवाब मलिकांनी दिले लॉकडाऊनचे संकेत

Published On - 3:00 pm, Sun, 4 April 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI