AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कधी ॲपेंडिक्स, कधी मूळव्याध… ठाकरे वि. शिंदे वाद पेटला, राऊतांच्या टीकेनंतर म्हस्केंचंही प्रत्युत्तर

शिंदे गट हा भाजपच्या पोटात उगवलेला ॲपेंडिक्स आहे. तो कधीही कापून टाकला जाईल, असे टीकास्त्र राऊत यांनी सोडले. त्यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली. मात्र त्यांच्या या विधानानंतर आता शिवसेना वि. शिवसेना असा कलगीतुरा रंगला असून शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनीही चोख शब्दांत प्रत्युत्तर दिलं

कधी ॲपेंडिक्स, कधी मूळव्याध... ठाकरे वि. शिंदे वाद पेटला, राऊतांच्या टीकेनंतर म्हस्केंचंही प्रत्युत्तर
संजय राऊतांच्या टीकेला नरेश म्हस्केंचं प्रत्युत्तर
| Updated on: Feb 07, 2025 | 12:13 PM
Share

ठाकरे गटाचे 6 खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. ऑपरेशन टायगरमध्ये ठाकरे गटाचे आणि काँग्रेसचे अनेक नेते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करतील, असा दावा केला जात आहे. मात्र यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत संतापले. शिंदे गट हा भाजपच्या पोटात उगवलेला ॲपेंडिक्स आहे. तो कधीही कापून टाकला जाईल, असे टीकास्त्र राऊत यांनी सोडले. त्यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली. मात्र त्यांच्या या विधानानंतर आता शिवसेना वि. शिवसेना असा कलगीतुरा रंगला असून शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनीही चोख शब्दांत प्रत्युत्तर दिलं. शिवसेना उबाठा ही काँग्रेसच्या शरीरातील मूळव्याध आहे, असा खोचक टोला म्हस्के यांनी लगावला.

महाबंडलेश्वर संजय राऊत बांडगुळाची भूमिका करत आहेत

महाबंडलेश्वर संजय राऊत यांनी आज सकाळी शिवसेना शिंदे गटावर आरोप केले, ते आम्हाला ॲपेंडिक्स म्हणाले, ते तर पोटात असतं. पण आज काँग्रेसच्या शरीरातील मूळव्याध म्हणजे शिवसेना ठाकरे गट आहे.काँग्रेसच्या झाडावरती संजय राऊत हे बांडगुळाची भूमिका करत आहेत. आज राहुल गांधींची दुपारी पत्रकार परिषद आहे, याची माहिती संजय राऊत हे पत्रकारांना देत होते. किती वाईट अवस्था झालेली आहे, राऊत यांना शिपायाचं काम करावं लागत आहे, अशा शब्दांत म्हस्के यांनी राऊतांवर टीका केली.

राऊत, आम्हाला ॲपेंडिक्स म्हणत असतील, ते तर पोटात असतं, पण आपण ( ठाकरे गट) मूळव्याध करून ठेवलेली आहे आणि ते कुठे असतं ते मला सांगण्याची गरज नाही. आपण अशा पद्धतीने टीका करत असाल तर आम्हालाही त्या भाषेत उत्तर देता येतं, असंही म्हस्केंनी सुनावलं. ठाकरे गट हे संपूर्णपणे रिकाम होणारं आहे. ठाकरे गटाला घरघर लागली आहे. संजय राऊत, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठआकरे, एवढीच मंडळी आता तिकडे राहणार आहेत, आगे आगे देखो होता है क्या, असं म्हणत नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला.

काय म्हणाले होते संजय राऊत ?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रोज त्यांचं ( शिंदे गट) ऑपरेशन करतात. त्यांचा रोज अपमान होत आहे. शिंदे गट हा भाजपच्या पोटात उगवलेला ॲपेंडिक्स आहे. तो कधीही कापून टाकला जाईल. पोटात ॲपेंडिक्सची एक गाठ असते. ती कधीही कापली जाऊ शकते. आमचं ऑपरेशन करण्यापेक्षा तुमचं ॲपेंडिक्सचं ऑपरेशन फडणवीस करत आहेत, त्याची तुम्ही काळजी घ्या, अशा शब्दात संजय राऊतांनी टीका केली होती.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?