तिकडे लागली वाळवी म्हणून इथे आले…, राजन साळवींच्या पक्षप्रवेशावेळी एकनाथ शिंदेंचा जबरदस्त टोला
राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे गट सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. एकनाथ शिंदे यांनी यावेळी जोरदार भाषण करत उद्धव ठाकरे गटाला जोरदार टोला लगावला. यामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे.

शिवसेना उद्धव ठाकरेला मोठा धक्का देत राजापूर विधानसभेचे माजी आमदार राजन साळवी यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राजन साळवी यांचा प्रवेश झाला. राजन साळवी यांच्यासोबत कोकणातील असंख्य पदाधिकाऱ्यांनीही शिंदे गटात प्रवेश केला. यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें जोरदार भाषण केले. या भाषणावेळी त्यांनी ठाकरे गटाला जोरदार टोला लगावला.
एकनाथ शिंदें यांनी राजन साळवींच्या पक्षप्रवेशावेळी जबरदस्त भाषण केले. या भाषणात त्यांनी ठाकरे गटाला जबरदस्त टोला लगावला. “जिथे विचारांना लागली वाळवी, तिथे कसा राहिल राजन साळवी, असा बॅनर मी वाचला. तिकडे लागली वाळवी म्हणून इथे आले राजन साळवी”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
“जो काम करेगा वही आगे जायेगा”
“कोकणातील ढाण्या वाघ पुन्हा शिवसेनेच्या गुहेत आला. आतादेखील ते आमदार झाले असते. किरण सामंत यांनी राजन साळवी यांना तिकीट द्या म्हणाले होते. या पक्षात जो काम करेल तो पुढे जाईल. राजा का बेटा राजा नही बनेगा, जो काम करेगा वही आगे जायेगा”, असे एकनाथ शिंदेंनी ठणकावून सांगितले.
“त्यांच्याकडे कोणच राहिले नाही”
“लोकाभिमुख योजना केल्या. पक्ष मोठा संघटना मोठी होत असेल तर सर्वांना सामील करू. देर आये दुरुस्त आये. कोणतीही अटी शर्त न ठेवता आले. शरद पवारांच्या हस्ते माझा सत्कार झाला. त्यावरुनही यांनी टीका केली. माझी लाइन कापण्यापेक्षा तुमची लाइन वाढवा. एकनाथ शिंदे जिथे उभा राहतो तिथून लाइन सुरु होते. आमचा पक्ष कार्यकर्ता घडवणारा पक्ष आहे. आत्मपरीक्षण करा, तुमच्याकडील लोक का जातात? शोले चित्रपट डायलॉग आठवतो, आधे इधर जावं आधे उधर जाव, बाकी मेरे पीछे आओ. त्यांच्याकडे कोणच राहिले नाही. आता यांच्याकडे कोणच राहिला नाही”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
घरी बसून काम होत नाही, फील्डवर जाऊन काम करा
“मी बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक आहे, मला हलक्यात घेऊ नका. ज्यांनी मला समजले नाही ते आता समजत आहे. मुख्यमंत्री झालो तेव्हा राजन साळवीची वाटत होतो, त्यांनी माझ्यासोबत यावे म्हणून फेसबुक लाईव्ह करून, घरी बसून काम होत नाही. फील्ड वर जाऊन काम करा. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही”, अशी ग्वाही एकनाथ शिंदेंनी यावेळी दिली.
