अमरावती महिला पोलीस हत्या प्रकरणात नवं ट्विस्ट, पतीला होता भलताच नाद, विरोध करताच घेतला जीव

अमरावतीमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्याची हत्या करण्यात आली होती, या घटनेनं शहरात खळबळ उडाली, आता या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अमरावती महिला पोलीस हत्या प्रकरणात नवं ट्विस्ट, पतीला होता भलताच नाद, विरोध करताच घेतला जीव
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 02, 2025 | 7:08 PM

अमरावतीमधून एक धक्कादायक घटना समोर आली होती, महिला पोलीस कर्मचाऱ्याची घरातच हत्या करण्यात आली, या घटनेनं शहरात खळबळ उडाली होती. आशा घुले वय वर्ष 38 असं या मृत महिला पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. अमरावती शहराच्या फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील गुरुकृपा कॉलनी मध्ये ही घटना घडली आहे, आशा घुले या अमरावतीमधील फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होत्या. दरम्यान या प्रकरणात पोलीस तपासामध्ये आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ती म्हणजे आशा घुले यांची हत्या दुसरी -तिसरी कोणी केली नसून त्यांच्या पतीनेच केली असल्याचं समोर आलं आहे. राहुल तायडे असं या आरोपीचं नाव आहे. विशेष म्हणजे आरोपी हा राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत आहे. राहुल तायडे यानेच आपली पत्नीच्या हत्येचा कट रचल्याचं समोर आलं आहे.

दोन मित्रांच्या मदतीने आपली पत्नी आशा घुले यांचा गळा दाबून राहुलने हत्या केली, धक्कादायक म्हणजे आरोपीने एक महिन्यांपूर्वीच पत्नीच्या हत्येचा कट रचला होता. अमरावतीच्या फ्रेजरपुरा पोलिसांनी आरोपीला अट केली आहे.

प्रेम प्रकरणातून हत्या  

आरोपी राहुल तायडे याचे एका महिलेशी प्रेम प्रकरण होतं. त्यातून पती-पत्नीमध्ये अनेकदा खटके उडत होते, सतत वाद होत होते अशी माहिती समोर आली आहे. 4- 5 वर्षांपासून आरोपीचं एका दुसऱ्या महिलेसोबत प्रेम प्रकरण होतं. यातून त्यांचे वाद होतं होते. यापूर्वी एकदा या प्रकरणात आशा घुले यांनी पोलीस ठाण्यात तक्रार देखील केली होती.

आरोपी पतीने रचला चोरीचा बनाव

आशा घुले यांचा मृतदेह त्यांच्या अमरावतीमधील घरात आढळून आला होता, या घटनेनं खळबळ उडाली. त्यांची गळा आवळून हत्या करण्यात आली, मात्र या प्रकरणातील आरोपी शोधून काढण्यात पोलिसांना यश मिळालं आहे. आरोपीनेच आपल्या पत्नीचा मित्रांच्या मदतीने खून केल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे, धक्कादायक म्हणजे आरोपीने हत्येपूर्वी चोरीचा बनाव रचल्याचं देखील समोर आलं आहे.