पशुलाही लाजवेल असं आईचं कृत्य, चार वर्षाच्या कोवळ्या जीवालाच…

मूळ घरमालकाने आपली एक रूम काही दिवसांपूर्वी एका महिलेला भाड्याने रहाण्यासाठी दिली होती. बेकरीमध्ये तयार होणारे प्रॉडक्ट विकून ती आपला घर खर्च भागवत होती.

पशुलाही लाजवेल असं आईचं कृत्य, चार वर्षाच्या कोवळ्या जीवालाच...
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Mar 28, 2023 | 5:58 PM

पुणे : मुलं कसंही असलं तरी ते आपल्या आई वडिलांचा जीव असतो. त्याच्या एका हसण्यानं आई वडील आपली सारी दुःख विसरून जातात. पण, पुण्यात एका आईनं आपल्या चार वर्षाच्या मुलीसोबत असं कृत्य केलं की ते पाहून पोलिसांच्याही अंगाचा थरकाप उडाला. ही घटना घरमालकामुळे उघडकीस आली. त्या घरमालकाने आपली खोली त्या बाईला भाड्याने दिली होती. आपल्या चार वर्षाच्या मुलीसह ती त्या घरात एकटीच रहात होती. बेकरीमधील प्रॉडक्ट विकून ती उदरनिर्वाह करत होती. सोमवारी ती राहते घर खाली करणार होती. त्यासाठी घरमालक तेथे गेले असता समोरचे दृष्य पाहून ते थबकले.

हडपसर येथील सिद्धिविनायक दुर्वांकुर सोसायटीत ही घटना घडली. मूळ घरमालकाने आपली एक रूम काही दिवसांपूर्वी एका महिलेला भाड्याने रहाण्यासाठी दिली होती. बेकरीमध्ये तयार होणारे प्रॉडक्ट विकून ती आपला घर खर्च भागवत होती. काही कारणामुळे तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला. तशी तिने घरमालकाला सूचना दिली होती.

हे सुद्धा वाचा

सोमवारी घरमालक ती महिला रहात असलेल्या घरी गेले. त्या घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी दरवाजा ठोठावला. आवाज दिला. पण, वारंवार आवाज देऊनही दरवाजा उघडला गेला नाही. त्यामुळे घरमालकांनी शेजाऱ्यांची मदत घेऊन दरवाजा उघडला. त्यांनी आत जाऊन पाहिले असता त्या चार वर्षांच्या मुलीचा मृतदेह दिसून आला.

घरमालकाने तत्काळ पोलिसांना फोन केला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना त्या लहान चिमुरडीचा चाकूने भोसकून खून करण्यात आल्याचे दिसून आले. त्यांनी मृत मुलीच्या आईकडे चौकशी केली असता तिनेच हा खून केल्याची कबुली दिली. तिच्या कबुलीवरून हडपसर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तिला अटक केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.