AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जिथे प्रेमाची किंमत… खवड्या डोंगर प्रकरणी कुणालच्या आईचा धक्कादायक व्हिडीओ, आदल्या रात्रीच…खळबळजनक माहितीने मोठा ट्विस्ट!

खवड्या डोंगरावरील घटनेनंतर महाराष्ट्र सुन्न झाला आहे. या हृदयद्रावक घटनेनंतर आता कुणाल याची आई संगिता चांदगुडे यांच्याबाबत माहिती उघडकीस आली आहे.

जिथे प्रेमाची किंमत... खवड्या डोंगर प्रकरणी कुणालच्या आईचा धक्कादायक व्हिडीओ, आदल्या रात्रीच...खळबळजनक माहितीने मोठा ट्विस्ट!
Sangita Chandgude video viral
| Updated on: Aug 22, 2026 | 10:41 PM
Share

ज्ञानेश्वर लोंढे, प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर :  छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावरील त्रिकोणी कुटुंबाच्या दुर्दैवी अंताने संपूर्ण देश सुन्न झाला आहे. जागोजागी लोक आपल्या पाल्याला मोबाईल आणि आयफोनवरुन समजावून सांगताना दिसत आहेत. या घटनेने जणू भारतीय सामुहिक मनाला धसका बसला आहे. सर्वत्र मोबाईलचा अपरिहार्यपणे सुरु झालेला वापर आणि घराघरात त्यावरुन पालक आणि टिनेजर मुलांमध्ये होणारे वाद. त्यात नेमकी अशी हादरा देणारी घटना घडल्याने सर्वजण विचारात सापडले आहेत. आता कुणाल चांदगुडे याच्या आईच्या संदर्भात एक महत्वाची माहिती समोर आली आहे.

कुणाल याने आयफोनमुळे खवड्या डोंगरावरुन स्वत:ला झोकून देण्यासाठी गेला होता. त्यावेळी तीन तास तेथे त्याची समजूत आई-वडील आणि गावचे सरपंच घालत होते. मात्र, तो काही बधला नाही. त्यानंतर वडील जवळ गेले आणि घात झाला. त्यांचा तोल जाऊन दोघेही कड्यावरुन थेट खाली कोसळले. त्यानंतर आईने स्वत: खवड्या डोंगरावरुन स्वत:ला झोकून दिले. या हृदयद्रावक घटनेनंतर आता कुणाल याची आई संगिता चांदगुडे यांच्याबाबत माहिती उघडकीस आली आहे. संगीता चांदगुडे या युट्युबर होत्या आणि आपल्या युट्युब चॅनेलवर तसेच आपल्या मनातील भावनाही व्यक्त करत होत्या.

विशेष म्हणजे, घटनेच्या आदल्या रात्रीच संगिता चांदगुडे एक भावनिक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये त्यांनी नात्यांमध्ये प्रेमाची आणि भावनांची किंमत न करणाऱ्या व्यक्तींविषयी भाष्य केलं होतं. त्यात त्या म्हणतात की प्रेम आणि आपुलकी दोन्ही बाजूंनी असायला हवी. पोळी जशी दोन्ही बाजूंनी शिजली की चांगली लागते असे उदाहरण त्यांनी दिले होते. “जिथे आपल्या प्रेमाची किंमत नाही, अशा नात्याला अर्थ नाही,” असही त्या म्हणाल्या आहेत. ज्या नात्यात दोन्ही बाजूंनी प्रेम, जिव्हाळा आणि एकमेकांच्या भावनांची कदर केली जाते, तेच नातं टिकवावं… अन्यथा अशा नात्यातून बाहेर पडणं चांगलं, अशी भावना त्यांनी या व्हिडिओमधून व्यक्त केल्याचे समोर आले आहे.

घटनेच्या काही तास आधीच केलेला हा भावनिक व्हिडिओ आता चर्चेत आहे. मात्र, या व्हिडिओचा या दुर्दैवी घटनेशी थेट संबंध होता, असा कोणताही निष्कर्ष सध्या काढता येणार नाही. या व्हिडिओ मागची नेमकी पार्श्वभूमी आणि घटनेशी त्याचा काही संबंध होता का, हे तपासातूनच स्पष्ट होणार आहे.

Follow Us
छात्रों की गूंज कार्यक्रमात प्रत्येकी ३५ हजार रुपये वाटप
नवनाथ बन यांचा दावा, छात्रों की गूंज कार्यक्रमात प्रत्येकी ३५ हजार रुपये वाटप
चित्रा वाघ यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
चित्रा वाघ यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल:
कार्यकर्ता तसेच विद्यार्थिनींनी साकारली राहुल गांधींची सुंदर रांगोळी
राहुल गांधींच्या पुणे दौऱ्याला उस्फुर्त प्रतिसाद! कार्यकर्ता तसेच विद्यार्थिनींनी सकारली सुंदर रांगोळी
पुण्यात राहुल गांधींना मुस्लिम तरुणांकडून खास भेट...
कार्यकर्त्यांचा उत्साह! पुण्यात राहुल गांधींना मुस्लिम तरुण देणार छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती
पुण्यात राहुल गांधींची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक; महाराष्ट्रातील राजकारणाब
पुण्यात राहुल गांधींची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक; महाराष्ट्रातील राजकारणाबाबत चर्चा, अगामी काळात...
राहुल गांधींचं पुण्यात पदाधिकाऱ्यांकडून स्वागत, कार्यक्रमाची...
राहुल गांधींचं पुण्यात पदाधिकाऱ्यांकडून स्वागत, कार्यक्रमाची जय्यत तयारी
सणासुदीपूर्वी चंद्रपूरमध्ये साखरेचे भाव गगनाला, सर्वसामान्यांचे बजेट
सणासुदीपूर्वी चंद्रपूरमध्ये साखरेचे भाव गगनाला, सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले
देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप: राहुल गांधींच्या...
देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप: राहुल गांधींच्या प्रचारासाठी इन्फ्लुएंसर्सना तब्बल...
Abdul Sattar: मराठा आरक्षणावर अब्दुल सत्तारांचे मोठे विधान;
Abdul Sattar: मराठा आरक्षणावर अब्दुल सत्तारांचे मोठे विधान; जरांगेंना चर्चेतून न्याय देणार
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली? काल रात्री घेतलेल्या बैठीकीनंतर आज...
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली? काल रात्री घेतलेल्या बैठीकीनंतर आज पुन्हा कोअर कमिटीची मिटिंग सुरु