AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विठ्ठलाच्या प्रसादाचा लाडू निकृष्ट दर्जाचा, हिवाळी अधिवेशनात धक्कादायक माहिती समोर

पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविक नित्यनेमाने जात असतात. विठुरायाच्या दर्शनानंतर प्रसाद म्हणून जो लाडू मिळतो, त्याचेही भाविक मनोभावे ग्रहण करतात. काहीजण तर तो प्रसाद घरीही घेऊन जातात. मात्र आता याच प्रासदाच्या लाडवावबाबत एका धक्कादायक बातमी समोर आली आहे

विठ्ठलाच्या प्रसादाचा लाडू निकृष्ट दर्जाचा, हिवाळी अधिवेशनात धक्कादायक माहिती समोर
Image Credit source: प्रातिनिधीक फोटो
| Updated on: Dec 13, 2023 | 11:12 AM
Share

नागपूर | 13 डिसेंबर 2023 : पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविक नित्यनेमाने जात असतात. विठुरायाच्या दर्शनानंतर प्रसाद म्हणून जो लाडू मिळतो, त्याचेही भाविक मनोभावे ग्रहण करतात. काहीजण तर तो प्रसाद घरीही घेऊन जातात. मात्र आता याच प्रासदाच्या लाडवावबाबत एका धक्कादायक बातमी समोर आली आहे. हा लाडू आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकतो, अशी माहिती अहवालातून समोर आली आहे. नागपूरमध्ये सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असून त्यादरम्यान हा अहवाल सादर करण्यात आला.

प्रसाद म्हणून मिळणारा हा लाडू निकृष्ट दर्जाजा असून तो ज्या कारखान्यात तयार केला जातो, तेथे स्वच्छतेचा अभाव आहे. या लाडूच्या सेवनाने भक्तांच्या आरोग्याला अपाय होऊ शकतो, असा इशारा लेखापरीक्षण अहवालात नोंदवला आहे. या अहवालाने विठ्ठल मंदिर समितीचा ढिसाळ कारभार उघड झाला आहे.

नागपूर येथे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती’चा वर्ष २०२०-२१ चा लेखापरीक्षण अहवाल व त्यावरील अनुपालन अहवाल सादर झाला.

काय म्हटलं आहे अहवालात ?

या अहवालामध्ये प्रसाद म्हणून देण्यात येणाऱ्या लाडूसंदर्भात गंभीर बाबी समोर आल्या आहेत. लाडू बनवण्याचे काम बचत गट जेथे करतात ती जागा अस्वच्छ आहे. लाडू सुकण्यासाठी कळकट ताडपत्री वापरली जात असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

तसेच 2020-21 मध्ये ज्या संस्थेला प्रसादाचा लाडू बनवण्याचं कंत्राट दिलं होतं. त्या संस्थेला लाडू बनवण्यासंदर्भात निकष लावण्यात आले होते.पण प्रत्यक्ष तपासणी अहवालामध्ये तफावत आढळून आली. लाडूच्या पाकिटावर जेघटक नोंदवलेले जातात, प्रत्यक्षात ते वापरलेच जात नाहीत. लाडू बनवण्यासाठी शेंगदाणा तेल वापरण्याची अट असल्याचे कंत्राटामध्ये नमूद आहे, प्रत्यक्षात सरकीचे तेल वापरले जाते.  विठ्ठलाचा प्रसाद म्हणून जे लाडू विकले जातात, त्यांच्या सेवनाने भक्तांच्या आरोग्यास अपाय होऊ शकतो, असा इशारा अहवालात देण्यात आला आहे.

Follow Us
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन