श्रीपाद छिंदम पोलीस संरक्षणात नगर महापालिकेत जाणार

अहमदनगर : शिवरायांबद्दल आक्षेपार्ह बरळणारा अहमदनगरचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदमने महापालिकेत जाण्यासाठी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. पोलिसांकडून छिंदमला संरक्षण पुरवलं जाणार आहे. अहमदनगरला महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक येत्या 28 तारखेला पार पडणार आहे. या  निवडणुकीसाठी श्रीपाद छिंदमने पोलीस संरक्षण मागितलंय. मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी छिंदमने पोलीस अधीक्षकांना पत्राद्वारे सशुल्क संरक्षणाची मागणी केली. माझ्या …

श्रीपाद छिंदम पोलीस संरक्षणात नगर महापालिकेत जाणार

अहमदनगर : शिवरायांबद्दल आक्षेपार्ह बरळणारा अहमदनगरचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदमने महापालिकेत जाण्यासाठी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. पोलिसांकडून छिंदमला संरक्षण पुरवलं जाणार आहे. अहमदनगरला महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक येत्या 28 तारखेला पार पडणार आहे. या  निवडणुकीसाठी श्रीपाद छिंदमने पोलीस संरक्षण मागितलंय.

मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी छिंदमने पोलीस अधीक्षकांना पत्राद्वारे सशुल्क संरक्षणाची मागणी केली. माझ्या जीवितास काही समाजकंटकांकडून धोका असल्याने बंदूकधारी संरक्षण मिळण्यासाठी विनंती छिंदमाने पत्रात केली आहे. त्यानुसार पोलिसांनी गोपनीय माहिती मिळवून छिंदमला पोलीस संरक्षण पुरवण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे छिंदम कोणत्या पक्षाला मतदान करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलंय. वाचानगरमध्ये वादग्रस्त श्रीपाद छिंदमचा तब्बल 1970 मतांनी विजय

सध्या महापौरपदावरून मोठा पेच निर्माण झालाय. कोणत्याच पक्षाला बहुमत नसल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून हालचालींना वेग आलाय. मात्र निवडणुकीच्या दिवशी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. यात दोन अतिरिक्त पोलीस अधीक्षक, सहा पोलीस निरीक्षक, 24 उपपोलीस निरीक्षक, 325 पोलीस कर्मचारी असा फौजफाटा असेल. वाचाछिंदम कसा जिंकला? महाराष्ट्राला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं!  

10 डिसेंबर रोजी अहमदनगर महापालिकेचा निकाल लागला. यामध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नाही. या निवडणुकीत सर्वात धक्कादायक निकाल लागला तो म्हणजे श्रीपाद छिंदमचा. श्रीपाद छिंदम संपूर्ण प्रचारादरम्यान तडीपार होता. शिवाय त्याच्याविषयी लोकांमध्ये रोषही होता. तरीही तो जवळपास दोन हजार मतांनी निवडून आल्याने सर्वांना धक्का बसला.  वाचाअहमदनगर आणि धुळे महापालिकेचा अंतिम निकाल

विविध कारणांमुळे चर्चेत असलेल्या अहमदनगर महापालिकेत अखेर त्रिशंकू परिस्थिती निर्माण झालेली आहे. शिवसेना 24 जागांसह पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी 18, तिसऱ्या क्रमांकावर भाजप 14 आणि काँग्रेस (5) चौथ्या क्रमांकावर फेकली आहे. या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी आहे. त्यामुळे आघाडीच्या 23 जागा आल्या आहेत. सत्तेसाठी आता काय राजकीय समीकरणं जुळतात याकडे लक्ष लागलंय. 68 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत बहुमतासाठी 35 जागांची आवश्यकता आहे.

अहमदनगर महापालिका निवडणूक अंतिम निकाल 2018 

शिवसेना – 24

राष्ट्रवादी -18

भाजप -14

काँग्रेस – 5

बसपा – 04

समाजवादी पक्ष – 01

अपक्ष 2

एकूण – 68

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *