फॉरेनची पाटलीन! जर्मनचं वऱ्हाड अहमदनगरमध्ये!

अहमदनगर : अहमदनगरमध्ये ‘फॉरेनची पाटलीन’ या सिनेमाचं कथानक काहीसं प्रत्यक्ष उतरल्याचं चित्र आहे. ‘जर्मनीची लेक’ नगरमधील भनगेवाडीची ‘सूनबाई’ बनली आहे. जर्मनीच्या कॅथरीनाने अहमदनगरच्या गणेशशी भारतीय संस्कृतीप्रमाणे लग्न केलं आहे. त्यामुळे या आगळ्या-वेगळ्या लग्नाची जिल्ह्यात चर्चा रंगली आहे. अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील गणेश पठारे हा मूळचा भनगडेवाडीचा रहिवासी आहे. 9 वर्षांपूर्वी गणेश जर्मनीत शिक्षण गेला आणि नंतर त्याला …

, फॉरेनची पाटलीन! जर्मनचं वऱ्हाड अहमदनगरमध्ये!

अहमदनगर : अहमदनगरमध्ये ‘फॉरेनची पाटलीन’ या सिनेमाचं कथानक काहीसं प्रत्यक्ष उतरल्याचं चित्र आहे. ‘जर्मनीची लेक’ नगरमधील भनगेवाडीची ‘सूनबाई’ बनली आहे. जर्मनीच्या कॅथरीनाने अहमदनगरच्या गणेशशी भारतीय संस्कृतीप्रमाणे लग्न केलं आहे. त्यामुळे या आगळ्या-वेगळ्या लग्नाची जिल्ह्यात चर्चा रंगली आहे.

अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील गणेश पठारे हा मूळचा भनगडेवाडीचा रहिवासी आहे. 9 वर्षांपूर्वी गणेश जर्मनीत शिक्षण गेला आणि नंतर त्याला तिथेच नोकरी मिळाली. गणेश प्राध्यापक म्हणून नोकरी करतोय. गणेशने BVSC मध्ये पीएचडी केली आहे. काही दिवसांपूर्वी गणेश आणि कॅथरीनाची ओळख झाली आणि हळूहळू दोघांमध्ये मैत्री वाढू लागली. नंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. अखेर त्यांनी लग्न करायचं ठरवलं.

जर्मनची कॅथरीना देखील एमडी आहे. ती कॉलेजमध्ये असताना, गणेशशी तिची भेट झाली. तेव्हापासूनच त्यांचे नाते घट्ट होत गेले. तसेच, कॅथरीनाला भारतीय संस्कृतीविषयी आपुलकी होती. कॅथरीना भारतात येऊनही गेली होती. तिला गणेशचे गाव पाहून आनंद झाला होता. तिला इथल्या संस्कृतीविषयी आवड निर्माण झाली. त्यानंतर दोघांच्या घरच्यांच्याही या लग्नाला परवानगी मिळाली.

, फॉरेनची पाटलीन! जर्मनचं वऱ्हाड अहमदनगरमध्ये!

अखेर गणेश आणि कॅथरीनाच्या लग्नाचा मुहूर्त ठरला. नंतर सुरु झाली लग्नाची धावपळ. लग्न मात्र गणेशाच्या गावाला म्हणजेच भनगडेवाडीला करायचं ठरलं. मग काय थेट जर्मनीचं वऱ्हाड धडकला भनगडेवाडीला. जर्मनीच वऱ्हाड येणार म्हटल्यावर गावकऱ्यांनी देखील जय्यत तयारी सुरु केली होती. हा विवाहसोहळा मोठ्या धुमधडाक्यात पार पडला. कॅथरीना दवखी अगदी भारतीय वधूप्रमाणे नटली होती.  या लग्नात जर्मनीहून कॅथरीनाचे 40 नातेवाईक आले होते. भारतीय संस्कृतीनुसार हा विवाहसोहळा पार पडला. भारतीय वेशभूषा परिधान करुन कॅथरीनाचे नातेवाईक या लग्न सोहळ्यात सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, या लग्नसोहळ्यात चक्क विदेशी पाहुण्यांनी देखील नाचण्याचा आनंद लुटला.

विशेष म्हणजे, गणेशच्या आईला देखील परदेशी सून घरात आल्याने खूप आनंद झाला आहे. तर माझा मुलगा शिक्षणासाठी परदेशी गेला, मात्र तो नाते जोडून आला, याचाही त्यांना आनंद आहे.

आता लग्नानंतर गणेश आणि कॅथरीना परत जर्मनीला जाणार आहेत. गणेशला नोकरी लागल्याने ते जर्मनीतच आपला संसार थाटणार आहे. मात्र भारतीय पद्धतीने विवाहसोहळा पाहून जर्मनचे पाहुणे मात्र खुश होते. शिवाय, या विवाहसोहळ्याची चर्चा सध्या संपूर्ण जिल्हाभर आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *