AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोलापूरच्या ‘चिमणी’ला हायकोर्टाचा दिलासा, चार आठवडे पाडकामास स्थगिती

सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडण्याच्या परवानगीसाठी सोलापूर महापालिकेतर्फे उच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला

सोलापूरच्या 'चिमणी'ला हायकोर्टाचा दिलासा, चार आठवडे पाडकामास स्थगिती
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Dec 31, 2020 | 10:12 AM
Share

सोलापूर : सोलापुरात विमान सेवेला अडसर ठरणाऱ्या सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणीला (Siddheshwar Sugar Factory Chimney) तूर्तास अभय मिळालं आहे. सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी चार आठवडे जैसे थे ठेवण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. 21 जानेवारी 2021 पर्यंत चिमणीचे पाडकाम न करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलं आहे. (Siddheshwar Sugar Factory Chimney relief from Bombay HC)

सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडण्याच्या परवानगीसाठी सोलापूर महापालिकेतर्फे उच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. तर साखर कारखान्याकडून स्थगितीसाठी उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली होती. विमानसेवेसाठी सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी अडसर ठरत असल्याने हा वाद आहे.

जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी न्यायालयाच्या स्थगितीकडे बोट दाखवत सोलापूरकरांना सबुरीचा सल्ला दिला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या दोन सदस्यीय खंडपीठाने 20 ऑगस्ट 2018 रोजी कारखान्याचे अपील फेटाळून लावले होते. भारतीय विज्ञान प्राधिकरण आणि नागरी विमान उड्डाण संचलनालय प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी काम करतात. त्यांच्या नियमांचं पालन केलं नाही तर समाजात चांगला संदेश जाणार नाही, असं उच्च न्यायालयात आदेशात म्हटलं होतं.

चिमणी अधिकृतच आहे मग ती पाडायला काय अडचण आहे? प्रशासन कसली वाट पाहत आहे? असा सवाल उच्च न्यायालयाने 2019 ला दिलेल्या आदेशात विचारला होता. सोलापूरच्या प्रशासनाने याबाबत त्वरित कार्यवाही करावी, असंही न्यायालयाने म्हटलं होतं. (Siddheshwar Sugar Factory Chimney relief from Bombay HC)

खासदार काय म्हणतात?

सोलापूरच्या विमान सेवेबाबत मी लोकसभेत दोन वेळा प्रश्न विचारला, मात्र उड्डाण योजनेतील विमानसेवेला साखर कारखान्याच्या चिमणीचा अडथळा येत असल्याची माहिती मिळाली आहे, असं सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी म्हणाले होते.

आयुक्त-जिल्हाधिकाऱ्यांचं म्हणणं काय?

महापालिका आयुक्त पी. शिवशंकर म्हणाले होते की, “चिमणी पाडण्यास मी तयार आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घ्यावा लागेल. तसे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे. 22 डिसेंबरपर्यंत थांबा” तर जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले होते, “केवळ सात दिवसांची मुदत द्या. चिमणीसंदर्भात मीच निर्णय घेतो. त्यानंतर शंभरकर यांनी शिक्षक आणि हदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक आचारसंहितेचं कारण पुढे केले होते.

संबंधित बातम्या

सोलापूरच्या विमानसेवेला साखर कारखान्याच्या चिमणीचा अडथळा

(Siddheshwar Sugar Factory Chimney relief from Bombay HC)

Follow Us
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण..
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण...
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...