AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! वाढदिवशीच भाजपच्या राज्यातील बड्या नेत्याकडून निवृत्तीचे संकेत, केली मोठी घोषणा

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, आपल्या वाढदिवशीच भाजपच्या बड्या नेत्याकडून आपल्या निवृत्तीचे संकेत देण्यात आले आहेत. यावेळी त्यांनी मोठी घोषणा केली.

मोठी बातमी! वाढदिवशीच भाजपच्या राज्यातील बड्या नेत्याकडून निवृत्तीचे संकेत, केली मोठी घोषणा
| Updated on: Mar 01, 2025 | 3:41 PM
Share

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, आपल्या वाढदिवशीच भाजपच्या बड्या नेत्याकडून आपल्या निवृत्तीचे संकेत देण्यात आले आहेत. माजी मंत्री आणि भाजपचे परतूर मंठा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी यापूढे आपण  विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचं म्हटलं आहे. मात्र साधुसंताच्या आशीर्वादानं आणि पक्षाने जर संधी दिली तर एकदा लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे, असंही लोणीकर यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले लोणीकर?   

बबनराव लोणीकर यांचा आज वाढदिवस आहे, आणि त्यांनी आपल्या वाढदिवशीच मोठी घोषणा केली आहे. यापुढे विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. ‘माझं वय आता 60 वर्षे झालेलं आहे, त्यामुळे मी आता रिटायरमेंटच्या दिशेनं आहे. त्यामुळे यापुढे विधानसभा लढायची नाही असं म्हणत माजी मंत्री आणि परतूर मंठा विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी विधानसभेच्या निवडणुकीतून निवृत्तीची घोषणा केली आहे.

मात्र दुसरीकडे साधू संतांच्या आशीर्वादाने आणि पक्षाने जर संधी दिली तर लोकसभा निवडणूक एकदा लढवण्याची इच्छा आहे. असं म्हणत लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेतही त्यांनी यावेळी दिले आहेत. आज बबनराव लोणीकर यांचा वाढदिवस असून यावेळी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना बबनराव लोणीकर यांनी ही घोषणा केली आहे. लोणीकर यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

लोणीकर हे भाजपाचे महत्त्वाचे नेते आहेत, मराठवाड्याच्या राजकारणात त्यांचा चांगला दबदबा आहे. ते माजी मंत्री देखील आहेत. सध्या ते परतूर आणि मंठा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. मात्र त्यांनी आता आपल्या वाढदिवशीच मोठी घोषणा केली आहे. आपन आता विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचं म्हणत, एकप्रकारे त्यांनी आपल्या निवृत्तीचेच संकेत दिले आहेत. मात्र दुसरीकडे त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा देखील व्यक्त केली आहे. साधू संतांच्या आशीर्वादाने आणि पक्षाने जर संधी दिली तर लोकसभा निवडणूक एकदा लढवण्याची इच्छा आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता लोणीकर यांना लोकसभेची संधी मिळणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.