निवडणुका लढवायच्या की नाही याचा विचार करावा लागेल, आमदार दीपक केसरकर यांचं मोठं विधान

"नारायण राणे यांना संपवण्याचा कट सुरु आहे. राणे साहेब तुम्हाला प्रचारात कुठे दिसतात का?. नारायण राणे यांना युती हवी होती. पण त्यांचा शब्द मानला नाही" असा दावा दीपक केसरकर यांनी केला.

निवडणुका लढवायच्या की नाही याचा विचार करावा लागेल, आमदार दीपक केसरकर यांचं मोठं विधान
Deepak Kesarkar
Updated on: Nov 29, 2025 | 1:00 PM

राज्यात सत्तेवर असलेल्या महायुतीमधील शिवसेना-भाजपमध्ये अनेक नगरपालिका, नगरपरिषदांमध्ये थेट सामना आहे. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत आहे. पण सिंधुदुर्गात महायुतीतील या दोन पक्षांमधील तणावाने टोक गाठलं आहे. शिवसेना-भाजपचे स्थानिक नेते परस्परांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करत आहेत. आता सावंतवाडीचे शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी एक मोठं विधान केलं. “महाराष्ट्रातील युती ही दिल्लीमधून ठरली आहे. त्यामुळे जनमताचा आदर केला पाहिजे. जनतेच्या कौलाबरोबर राहीलं पाहिजे असं मला वाटतं. पैसे वाटप करण्याचा चुकीचा पायंडा सिंधुदुर्गात पाडला जात आहे” असा आरोप दीपर केसरकर यांनी केला. “मालवण बरोबरच सावंतवाडीमध्ये सुद्धा जोरदार पैशाचे वाटप होत आहे. पुढच्या काळात निवडणुका लढवायच्या की नाही याचा विचार करावा लागेल” असं मोठं विधान दीपक केसरकर यांनी केलं. ‘पैसे देऊन मतदान करून घेणारे विकास काय करणार?’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

“रवींद्र चव्हाण हे सिंधुदुर्गचे सुपुत्र आहेत. त्यांनी युती करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा होता” असं दीपक केसरकर म्हणाले. सावंतवाडीतील राजघराण्यातील असलेले भाजपचे उमेदवार श्रद्धाराजे भोसले त्यांच्या घराण्यावर आमदार दीपक केसरकर यांनी आरोप केलेत. “सावंतवाडीतील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होऊ शकलं नाही. याचा दोष संपूर्ण राजघराण्यावर जातो. राजघराण्याने बदली जागा मागितली होती. तो सुद्धा मी कॅबिनेटमधून प्रस्ताव मंजूर करून आणला.
मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल संदर्भात जमीन देऊ केली आहे. पण केवळ तांत्रिक बाबीसाठी पाच वर्ष अडवून ठेवलय” असा केसरकर यांनी आरोप केला.

मोती तलाव हे सावंतवाडीचे भूषण

“बजेट मंजूर असून टेंडर देखील झालय.राजघराण्याला लोकहिताची काळजी होती, तर त्यातून त्यांनी मार्ग काढायला हवा होता. शासनाची 50% जागा दिल्यानंतर अडवून ठेवणं सपशेल चुकीचं आहे. मोती तलाव हे सावंतवाडीचे भूषण आहे.
मोती तलाव हे आपल्या मालकीचा आहे अशी केस राजघराण्याने घातली आहे. त्यांच्याच घरातील व्यक्ती नगराध्यक्षपदी बसेल. मोती तलाव नगर परिषदेच्या मालकीचा राहील की नाही असा प्रश्न निर्माण होतो.सावंतवाडीतील प्रत्येक सुजाण नागरिकांनी विचार करावा” असं दीपक केसरकर म्हणाले.

वेंगुर्लेवासियांना कुणी विकत घेऊ शकत नाही

“पैशाने मते विकत घेणे हा मोठा पराक्रम नसतो. मागच्या वेळेला त्यांनी पैसे वाटले. म्हणून आमचा पराभव झाला.
कुणी किती पैसे वाटले तरी वेंगुर्लेवासियांना कुणी विकत घेऊ शकत नाही.