AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संतोष देशमुखांसाठी आयोजित केलेल्या मूक मोर्चातून अंजली दमानियांची माघार, कारण…

आता या मूक मोर्चातून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी माघार घेतली आहे. त्यांनी स्वत: याबद्दलची घोषणा केली आहे. तसेच त्यांनी यामागचे कारणही सांगितले आहे.

संतोष देशमुखांसाठी आयोजित केलेल्या मूक मोर्चातून अंजली दमानियांची माघार, कारण...
| Updated on: Dec 28, 2024 | 11:38 AM
Share

Anjali damania Not Participate in Beed Morcha : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेचा सर्वच स्तरावरुन निषेध व्यक्त करण्यात येत आहे. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन आज सर्वपक्षीय नेत्यांच्या वतीने मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी हा मूक मोर्चा काढला जाणार आहे. आता या मूक मोर्चातून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी माघार घेतली आहे. त्यांनी स्वत: याबद्दलची घोषणा केली आहे. तसेच त्यांनी यामागचे कारणही सांगितले आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नुकतंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी अंजली दमानिया यांनी बीडमधील मोर्चात सहभागी होणार नसल्याचा सांगितले.

“मी आजच्या मोर्चात सहभागी होणार नाही”

“काही राजकीय नेते हा ड्रामा करत आहेत, असे मला कुठेतरी वाटत आहे. संतोष देशमुखांचे कुटुंब या मोर्चात जाणार आहेत. अनेकजण या मोर्चात जातील. पण मी आजच्या मोर्चात सहभागी होणार नाही”, असे अंजली दमानिया म्हणाल्या.

“आम्ही ठिय्या आंदोलन करणार”

“कारण या मोर्चात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला पूर्ण कल्पना आहे की धनंजय मुंडे कसे आहेत. काही महिन्यांपूर्वी शरद पवारांनी धनंजय मुंडे कसे आहेत, हे सांगितलंही होतं. त्यावेळी त्यांनी धनंजय मुडेंचे अनेक कारनामे आम्ही पाठीशी घातले होते. यातील एक कारनामा म्हणजे वाल्मिक कराड. या अशा लोकांना पुढे करुन जी दहशत पसरवली जाते, ती कुठेतरी थांबवायला हवी. त्यामुळे आम्ही या मोर्चात न भाग घेता, कलेक्टरच्या ऑफिसबाहेर बसणार आहोत. ज्या कोणाला त्यात साथ द्यायची असेल, त्यांनी द्यावी. पण जोपर्यंत वाल्मिक कराडला अटक होत नाही आणि धनंजय मुंडेंचे मंत्रिपद सोडायला आम्ही भाग पाडत नाही, तोपर्यंत आम्ही तिथे ठिय्या आंदोलन करणार आहोत”, असे अंजली दमानिया यांनी म्हटले.

“धनंजय मुंडेंसारखे मंत्री नको”

“आम्हाला धनंजय मुंडेंसारखे मंत्री नको. जे आमच्या राज्यासाठी कायदे बनवणारे मंत्री जर गुन्हेगार असतील, त्या प्रवृत्तीचे असतील, तर असे मंत्री आम्हाला नको. त्यामुळे या सारख्या मंत्र्यांना राजीनामा द्यायला आम्ही भाग पाडू आणि बीडची जनताही त्यांना भाग पाडेल”, याची मला खात्री आहे, असेही अंजली दमानियांनी सांगितले.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.