AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anjali Damania : अशोक खरातांमुळे मोठ्या झाल्या, तर त्याच्यासाठी काय काय.. चाकणकरांच्या राजीनाम्यावर दमानियांची पहिली प्रतिक्रिया

Anjali Damania : "कधी त्यांना पप्पा म्हणायच्या, कधी त्यांना केक भरवायच्या. हे सगळं बघून आणि कुठल्याही महिलेने अशा पद्धतीने गुरुस्थानी जरी मानलं असलं तरी त्यांच्या मिस्टरांनी पाय धुतले असते तर ते योग्य होतं. पण एका परपुरुषाचे अशा पद्धतीने पदराने पाय पुसणं मला तरी खपत नाही"

Anjali Damania : अशोक खरातांमुळे मोठ्या झाल्या, तर त्याच्यासाठी काय काय.. चाकणकरांच्या राजीनाम्यावर दमानियांची पहिली प्रतिक्रिया
Rupali Chakankar Anjali Damania
| Updated on: Mar 28, 2026 | 12:21 PM
Share

“रूपाली चाकणकर यांचा राजीनामा प्रत्येक पीडित स्त्रीला समर्पित करायला पाहिजे. त्याची सुरुवात मला वाटतं संपदा मुंडेंपासून करायला हवी. त्यांना हा राजीनामा समर्पित आहे. दुसरं म्हणजे ज्या ज्या महिलांना वेदना होती, त्यांच्या वेदनांना न्याय मिळत नव्हता, त्या प्रत्येक महिलेला समर्पित आहे” अशी अंजली दमानिया यांनी रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे. अंजली दमानिया या सामाजिक कार्यकर्त्या आहे. भोंदूबाब अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. याआधी त्यांनी मागच्या आठवड्यात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. भोंदूबाबा अशोक खरातने अनेक महिलांचं लैंगिक शोषण केलं. रुपाली चाकणकर यांच्यावर त्याला पाठिशी घालण्याचा आरोप आहे.

“रूपाली चाकणकर यांनी वर येण्याचा जो मार्ग वापरला होता, तो मार्गच चुकीचा होता. वर नक्कीच माणसाने जावं पण स्वतःच्या कर्तुत्वावर जावं. जे जे प्रकरण दाबलय तेथे बाहेर आलं पाहिजे. त्यांच्यावर एफआयआर झाली पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई देखील झाली पाहिजे. तेव्हाच खरा न्याय त्या महिलांना मिळेल” असं अंजली दमानिया म्हणाल्या. “स्वतः म्हणाल्या आहेत हे की मी जर मोठी झाले तर ती अशोक खरातांमुळे झाली, तर त्यांच्यासाठी काय काय करावं लागलं होतं. खरंतर याचा खुलासा केला पाहिजे” असं अंजली दमानिया म्हणाल्या.

मला तरी खपत नाही

“कधी त्यांना पप्पा म्हणायच्या, कधी त्यांना केक भरवायच्या. हे सगळं बघून आणि कुठल्याही महिलेने अशा पद्धतीने गुरुस्थानी जरी मानलं असलं तरी त्यांच्या मिस्टरांनी पाय धुतले असते तर ते योग्य होतं. पण एका परपुरुषाचे अशा पद्धतीने पदराने पाय पुसणं मला तरी खपत नाही. आणि मला ते मान्य देखील होत नाही” असं अंजली दमानिया यांनी सांगितलं.

त्यांना वाचवणारं एकमेव नाव म्हणजे सुनील तटकरे

“सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी खरंतर अनेक गोष्टी करणं अपेक्षित होतं. हे ज्या दिवशी बाहेर आलं त्याचं दिवशी त्यांनी स्वतःहून रूपाली चाकणकरांना बोलवून सांगायला हवं होतं की आमचं त्याच्याशी काही घेणं देणं नाही. पण आताच्या घटकेला आम्हाला असं वाटतं की हा न्याय मिळण्यासाठी त्यांनी पदाचा राजीनामा देऊन त्याची पूर्ण चौकशी करू” असं अंजली दमानिया म्हणाल्या. “प्रत्येक ठिकाणी त्यांना वाचवणारं एकमेव नाव त्यांच्या पक्षात म्हणजे सुनील तटकरे.रूपाली चाकणकर यांच्यावर कारवाई केली पाहिजे” अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली.

Follow Us
MPSC च्या आंदोलनासाठी बारामतीतून गाड्या आणल्या म्हणत थेट व्हिडीओच...
MPSC च्या आंदोलनासाठी बारामतीतून गाड्या आणल्या म्हणत थेट व्हिडीओच दाखवला; रोहित पवारांवर गंभीर आरोप
नवरात्रीचा खर्च कमी करून दुष्काळग्रस्तांसाठी मोठी मदत; 18 लाख...
इतर खर्च कमी करून दुष्काळग्रस्तांसाठी मोठी मदत; 11 लाख देण्याचा निर्णय, भाजप नेत्याचा पुढाकार
बोरिवलीतील सावरकर उद्यानात गुजराती बॅनरवरून मनसेचे आंदोलन, मराठी...
बोरिवलीतील सावरकर उद्यानात गुजराती बॅनरवरून मनसेचे आंदोलन, मराठी-गुजराती मुद्द्यावरून वाद
भोरमध्ये भातशेती संकटात; पावसाअभावी जमिनीला भेगा, हातातोंडाशी आलेलं...
भोरमध्ये भातशेती संकटात; पावसाअभावी जमिनीला भेगा, हातातोंडाशी आलेलं पीक करपलं
रोहित पवार आमच्यासोबत कॅबिनेटमध्ये मंत्री होतील; नितेश राणेंचं विधान
रोहित पवार आमच्यासोबत कॅबिनेटमध्ये मंत्री होतील अन्... नितेश राणेंचं मोठं विधान चर्चेत
आदिवासी विद्यार्थ्यांचा मुंबई मोर्चा पोलिसांनी रात्रीच अडवला...
आदिवासी विद्यार्थ्यांचा मुंबई मोर्चा पोलिसांनी रात्रीच अडवला, विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी...
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी जाणार
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा अन्...
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उमेदवार
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उभा केला उमेदवार, सामना'तून दिली माहिती
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान...
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान व्हायरल