AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोलापुरात राजकीय भूकंप, भाजपाचा मास्टरस्ट्रोक; एकाच दिवशी 4 बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात भाजपने ऑपरेशन लोटस यशस्वी केले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वी चार माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. यात माढ्यातील रणजितसिंह शिंदे यांच्यासह मोहोळ आणि सोलापूर शहरातील नेत्यांचा समावेश आहे.

सोलापुरात राजकीय भूकंप, भाजपाचा मास्टरस्ट्रोक; एकाच दिवशी 4 बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश
BJP
| Updated on: Oct 27, 2025 | 10:50 AM
Share

सध्या राज्यातील महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्यातच आता सर्वच पक्षांमध्ये इनकमिंग आऊटगोईंग सुरु झाले आहे. भाजपने सध्या सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाचे ऑपरेशन लोट्स सुरु केले आहे. त्यांचे हे ऑपरेशन लोट्स यशस्वी झाले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी जिल्ह्याची राजकीय समीकरणे बदलून टाकणारा हा मोठा घटनाक्रम आहे. येत्या बुधवारी २९ ऑक्टोबर रोजी मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि काँग्रेसमधील चार बड्या माजी आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसला खिंडार पडले आहे.

माढ्याच्या राजकारणात मोठा भूकंप

माढ्याचे माजी आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र आणि जिल्हा दुध संघाचे माजी चेअरमन रणजितसिंह शिंदे हे भाजपात प्रवेश करणार आहेत. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत असलेल्या शिंदे यांनी अखेर भाजपची वाट धरण्याचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे उमेदवार अभिजीत पाटील यांनी रणजित शिंदे यांचा ३० हजार मतांच्या फरकाने मोठा पराभव केला होता. या पराभवानंतर रणजित शिंदे यांनी आता भाजप पक्षात प्रवेश करून माढा मतदारसंघात नवी राजकीय इनिंग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ते माढा मतदारसंघातील आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांसोबत मुंबईत भाजपमध्ये दाखल होत आहेत. रणजित शिंदे यांचा हा निर्णय माढ्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडवणारा ठरला आहे.

रणजित शिंदे यांच्यासह मोहोळचे माजी आमदार राजन पाटील आणि यशवंत माने तसेच सोलापूर शहरातील काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांचाही भाजपमध्ये प्रवेश निश्चित झाला आहे. साधारण तीन ते चार माजी आमदार एकाच दिवशी भाजपमध्ये दाखल होत आहेत. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद, नगरपंचायत आणि महापालिका निवडणुकांमध्ये सोलापूर जिल्ह्यात स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या भाजपच्या हालचालींना बळ मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.

भाजपची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढणार

माजी आमदार दिलीप माने यांच्या पक्षप्रवेशाला भाजपचे स्थानिक आमदार सुभाष देशमुख यांच्या समर्थकांनी तीव्र विरोध दर्शवला होता. या विरोधामुळे दिलीप माने यांचा प्रवेश काही काळ अडकला होता. मात्र, पक्ष नेतृत्वाने यावर तोडगा काढत स्थानिक नेत्यांशी चर्चा केली. अखेर, भाजप नेतृत्वाने स्थानिक विरोध झुगारून चारही माजी आमदारांचा पक्षप्रवेश निश्चित केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजप नेतृत्वाच्या या निर्णयामुळे सोलापूर जिल्ह्यातील भाजपची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. तसेच यामुळे विरोधी पक्षांना आगामी काळात मोठे आव्हान निर्माण होणार आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.