AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रदीप कदमला त्रास का देतो? बोल घालू का गोळ्या… लोडेड पिस्तुल डोक्याला लावून जबर मारहाण; सोलापूर हादरले

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे धक्कादायक घटना घडली. दोन गुन्हेगारांनी एका व्यक्तीला लोडेड पिस्तुलचा धाक दाखवून अमानुष मारहाण केली. त्याला प्रदीप कदमच्या पाया पडण्यास भाग पाडले, जातीय शिवीगाळ केली आणि तोंडावर लघवी करण्याची धमकी दिली.

प्रदीप कदमला त्रास का देतो? बोल घालू का गोळ्या... लोडेड पिस्तुल डोक्याला लावून जबर मारहाण; सोलापूर हादरले
KarmalaImage Credit source: Tv9 Network
| Updated on: May 24, 2026 | 11:21 AM
Share

राज्यातील गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. काही भागात तर गुन्हेगारांच्या मनात काहीच भय राहिलेले दिसत नाही. दिवसाढवळ्या हल्ले होत आहेत. महिलांचे विनयभंग केले जात आहेत. चोऱ्या होत आहेत. एवढेच कशाला आता पेट्रोल पंपावरही मारामारी, चाकू हल्ले होताना दिसत आहे. भय नावाची गोष्टच उरलेली नाही. सोलापुरात तर दोन गुन्हेगारांनी लोडेड पिस्तुल डोक्याला लावून एकाला जबर मारहाण केली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून आरोपीला जबर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.

मित्राला त्रास देत असल्याचे सांगत करमाळा तालुक्यातील कंदर येथील दोघांनी एकाला पिस्टल आणि कोयत्याचा धाक दाखवत इतर तिघांना बोलावून मारहाण केली. या दोघांनी जातीवाचक शिवीगाळ आणि अपमानास्पद वागणूक दिली आहे. याप्रकरणी दोघा मित्रांसह इतर तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत कंदर येथील आनंद अशोक खांडेकर (वय-36 वर्षे) यांनी फिर्याद दिली आहे.

पाया पडायला लावले

कंदर गावातील मराठी शाळेजवळ असताना स्वप्निल देवडकर आणि प्रदिप कदम या दोघांनी त्यांना स्विफ्ट कारमध्ये बसवले. त्यानंतर स्वप्निलने आनंद खांडेकर यांच्या डोक्याला लोड केलेली पिस्टल लावून ‘प्रदिप कदमला का त्रास देतो, बोल गोळ्या घालू’ असे म्हणत मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर स्वप्नीलने फिर्यादी खांडेकर यांना जातीवाचक शिवीगाळ करत प्रदीपच्या पाया पडण्याचा आग्रह धरला. आनंद यांनी पाया पडण्यास नकार दिल्यानंतर स्वप्निलने त्याच्या भाच्यासह इतर दोघांना तेथे बोलवून त्यांच्यावर कोयता उगारून प्रदीपला आणि गाडीत असणाऱ्या दोन लहान मुलांच्या पाया पडण्यास भाग पाडले.

तोंडावर लघवी करण्याची धमकी

त्यानंतर स्वप्नीलने फिर्यादी आनंद खांडेकर यांना गाडीमध्ये बसवले. त्याला त्याच्या घरी नेऊन लहान मुलांना तोंडावर लघवी करण्यास सांगण्याची धमकी देत त्याच्या आई-वडिलांच्याही पाया पडण्यास भाग पाडले. यानंतर प्रदीपकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास गोळ्या घालण्याची धमकी दिली. पोलिसात अॅट्रोसिटीची तक्रार दिली तरी माझे कोणी काहीच वाकडे करू शकणार नाही, अशी धमकीही त्याने दिली.

करमाळा पोलिसांनी स्वप्निल देवडकर, प्रदिप कदम, स्वप्निलचा भाचा आणि दोन अनोळखी लोकांविरुद्ध अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल केला असून करमाळा पोलिसांनी स्वप्निल देवडकर या आरोपीला ताब्यात घेतले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी अंजना कृष्णा तपास करत आहेत.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ