AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Solapur Crime : सोलापुरात दोन व्यावसायिकांच्या घरात घरफोडी; 28 तोळे सोने लंपास

कार्यक्रमच्या निमित्ताने हे दोन्ही परिवार गावी गेलेले होते. याचीच संधी साधून दरोडेखोरांनी ऐवज लुटला आहे. काल मध्यरात्री जेव्हा खान परिवार घरी परतले तेव्हा त्यांच्या बंगल्याच्या तीनही मजल्यावरील साहित्य चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर समोर असलेल्या थीम्सवाला यांच्या घरात ही चोरी झाल्याचे निदर्शनास आले आहे.

Solapur Crime : सोलापुरात दोन व्यावसायिकांच्या घरात घरफोडी; 28 तोळे सोने लंपास
Image Credit source: टीव्ही9
| Edited By: | Updated on: Mar 01, 2022 | 11:58 PM
Share

सोलापूर : दोन व्यावसायिकांची घरे सलग दोन दिवस फोडून 28 तोळे सोने (Gold) चोरट्यांनी लंपास केल्याची घटना सोलापूरमध्ये घडली आहे. हैदराबाद रोडवरील मंत्री चांडक आंगण परिसरातील खान आणि थीम्सवाला परिवारांचे घर चोरट्यां (Thieves)नी फोडले आहे. रविवार आणि सोमवार रात्रीच्या दरम्यान या घटना घडल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जातोय. सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक असलेल्या खान यांच्या घरात तर त्यांच्या घरासमोरच असलेल्या थीम्सवाला परिवाराचे घर दरोडेखोरांनी लुटलं आहे. प्राथमिक चौकशीत जवळपास 285 ग्राम इतके सोने चोरीला गेल्याचं निष्पन्न झालं आहे. मात्र चोरीला गेलेला मुद्देमाल आणि रक्कम वाढण्याची देखील शक्यता आहे. (Burglary at the house of two businessmen in Solapur; 285 gram gold stolen)

खान कुटुंबीय घरी परतल्यानंतर चोरीची घटना उघड

कार्यक्रमच्या निमित्ताने हे दोन्ही परिवार गावी गेलेले होते. याचीच संधी साधून दरोडेखोरांनी ऐवज लुटला आहे. काल मध्यरात्री जेव्हा खान परिवार घरी परतले तेव्हा त्यांच्या बंगल्याच्या तीनही मजल्यावरील साहित्य चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर समोर असलेल्या थीम्सवाला यांच्या घरात ही चोरी झाल्याचे निदर्शनास आले आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त हरीश बैजल, उपायुक्त डॉ. वैशाली कडुकर यांच्यासह वरिष्ठ पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच दरोडेखोरांच्या तपासासाठी पोलिस पथक वेगवेगळ्या ठिकाणी रवाना करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. संतोष गायकवाड यांनी दिली.

ठाण्यात फेरीवाल्यांच्या वेशात आलेल्या चोरट्यांकडून दिवसाढवळ्या चोरी

फेरीवाला बनून परिसरात रेकी करुन दिवसाढवळ्या घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना कळवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शेखर नटराज नायर आणि देवेंद्र गणेश शेट्टी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सीसीटीव्हीच्या सहाय्याने पोलिसांनी चोरट्यांचा माग काढत त्यांची गठडी वळली. चोरट्यांकडून 12 तोळे सोने हस्तगत करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही चोरटे सहा महिन्यांपूर्वीच कारावासाची शिक्षा भोगून बाहेर आले होते. कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मनीषा नगर परिसरात एका घरात कुणीही नसल्याची संधी साधत या चोरट्यांनी घराचे कुलूप फोडून सोने चोरुन पोबारा केला होता. महिला संध्याकाळी घरी आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर महिलेने तात्काळ कळवा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी एक पथक तयार केले. त्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीचा माघ काढत आरोपींचा शोध घेतला. (Burglary at the house of two businessmen in Solapur; 285 gram gold stolen)

इतर बातम्या

Facebook : फेसबुकचा कारवाईचा बडगा; महिनाभरात एक कोटींहून अधिक तक्रारींची दखल

Thane Youth Murder : पब्जी खेळाच्या वादातून 21 वर्षीय तरुणाची हत्या, तिघा आरोपींना वर्तकनगर पोलिसांकडून अटक

इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.