गौतमी पाटीलच्या नृत्याबाबत सातारा न्यायालयात तक्रार; नृत्यांगणा मृणाल कुलकर्णी यांची प्रतिक्रिया काय?

| Updated on: Jan 24, 2023 | 8:21 PM

गुन्हा दाखल झाल्याचं वाईट वाटतंय. मात्र लोकांनी ही आपल्या नृत्यावर आक्षेप घेऊ नयेत. जेणे करून लोक कलावंतांवर गुन्हा दाखल होण्याची दुर्देवी वेळ येणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.

गौतमी पाटीलच्या नृत्याबाबत सातारा न्यायालयात तक्रार; नृत्यांगणा मृणाल कुलकर्णी यांची प्रतिक्रिया काय?
गौतमी पाटील
Follow us on

  सोलापूर (माढा) : नृत्यांगणा गौतमी पाटील चर्चेत आली ती तिच्या अश्लील नृत्यामुळं. आता तिच्या अश्लील नृत्याप्रकरणी सातारा न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली. महालक्ष्मी फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रतीभा शेलारे यांनी सातारा कोर्टात गौतमी पाटील विरोधात तक्रार दाखल केली. सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करणे या कलमान्वये गौतमी पाटील विरोधात कोर्टात तक्रार दाखल करण्यात आली. 23 मार्चला याप्रकरणी आता सुनावणी होणार आहे. सातारा न्यायालयात गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रसिद्ध नृत्यांगणा मृणाल कुलकर्णी यांनी गौतमी पाटीलवर जोरदार टीका केली.

मृणाल कुलकर्णी म्हणाल्या, गुन्हा दाखल झाल्याचं वाईट वाटतंय. मात्र लोकांनी ही आपल्या नृत्यावर आक्षेप घेऊ नयेत. जेणे करून लोक कलावंतांवर गुन्हा दाखल होण्याची दुर्देवी वेळ येणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.

असले प्रकार लावणीत नाहीत

अश्लील हावभाव करणे, लोकांना घाणेरडे हातवारे करणे, शार्ट कपडे घालणे हे असले प्रकार लोककलेत व लावणीत येतच नाहीत, असंही मृणाल कुलकर्णी यांनी म्हंटलं.

लावणीकडे बघण्याचा महिलांचा दृष्टीकोन बदलत असताना गौतमी पाटीलने लावणीची संस्कृती जपावी. गौतमी पाटीलने माफी मागितली. नृत्यामधून अश्लील प्रकार कार्यक्रमात माझ्याकडून होणार नाहीत. असे सांगीतले. मात्र तिच्याकडून पुन्हा तेच घडतंय. याला आळा घालणं गरजेचे आहे, असंही मृणाल कुलकर्णी म्हणाल्या.

तर मग त्यांनी कसं जगायचं?

गौतमी पाटीलच्या नृत्यांचा व कार्यक्रमाचा आम्हा राज्यभरातील कलाकारांना त्रास होता कामा नये. तिच्यामुळे राज्यभरातील लोककलेच्या कार्यक्रमावर बंदी येईल. ज्याचं जगणंच लावणीवर आहे. त्यांनी मग कसं जगायचं, असा सवाही मृणाल कुलकर्णी यांनी उपस्थित केला.