चांदीच्या तारांऐवजी निळ्या रंगाच्या प्लास्टिकचा वापर; इतक्या लाखांच्या बनावट नोटा जप्त

गोविंद ठाकूर

गोविंद ठाकूर | Edited By: गोविंद हटवार, Tv9 मराठी

Updated on: Jan 24, 2023 | 8:29 PM

मालवणी पोलीस आता आरोपींकडे 19 लाखांच्या बनावट नोटा कोठून आणल्या. त्या कोठून छापल्या, त्यांच्यासोबत किती लोक होते याचा तपास करत आहेत.

चांदीच्या तारांऐवजी निळ्या रंगाच्या प्लास्टिकचा वापर; इतक्या लाखांच्या बनावट नोटा जप्त

मुंबई : मुंबईतील (Mumbai Crime) मालवणी पोलिसांनी (Malvani Police) दुसऱ्यांदा बनावट नोटांसह दोन गुन्हेगारांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 19 लाख रुपयांच्या वेगवेगळ्या नोटा जप्त केल्या. यात 2000, 500, 200 आणि 100 च्या बनावट नोटांचा समावेश आहे. हे आरोपी पालघरहून मुंबईत यायचे आणि बनावट नोटा चालवायचे. नोटेच्या मध्यभागी असलेल्या चांदीच्या ताराऐवजी निळ्या रंगाच्या प्लास्टिकचा (चकाकी) वापर करण्यात आला. नोट बनावट दिसू नये, असा त्यांचा प्रयत्न होता. 23 जानेवारी रोजी मालवणी पोलिसांना रात्री गस्त घालत असताना एमएचबी कॉलनी, मालवणी गेट क्रमांक 8 जवळ एक व्यक्ती आढळला.

पोलिसांनी त्याची झडती घेतली असता आरोपी फहिल इरफान शेख याच्याकडून एक लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. मालवणी पोलिसांनी दुसरा आरोपी मेहबूब नबीसाब शेख याला पालघर येथून अटक केली. घराची झडती घेतली असता १८ लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

 

19 लाखांच्या बनावट नोटा

या बनावट नोटांमध्ये 2000 रुपयांच्या 500 नोटा, 500 रुपयांच्या 1800 नोटा, 200 रुपयांच्या 5 नोटा, 100 रुपयांच्या 5 नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून एकूण १९ लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

नोटा आल्या कुठून?

मालवणी पोलीस आता आरोपींकडे 19 लाखांच्या बनावट नोटा कोठून आणल्या. त्या कोठून छापल्या, त्यांच्यासोबत किती लोक होते याचा तपास करत आहेत. पालघर बोईसर येथील आरोपी मेहबूब नबीसाब शेख याच्यावर 420 चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती परिमंडळ ११ चे पोलीस उपायुक्त अजय कुमार बन्सल यांनी दिली.

या बनावट नोटा कुठं तयार केल्या. त्या कुणी तयार केल्या, याचा शोध मालवणी पोलीस करत आहेत. सध्या दोन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात मालवणी पोलिसांना यश आलं. आता आणखी काही आरोपी पोलिसांच्या रडारवर येणार आहेत. त्यानंतर हे स्कॅम किती मोठं आहे, याची माहिती समोर येईल.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI