कीर्तनकारांनी 5 हजार जास्त घेतले की…इंदुरीकर महाराजांनी असे घेतले फैलावर

Indurikar Maharaj : इंदुरीकर महाराजांचे किर्तन हा वेगळाच थाट असतो. त्यांच्या किर्तनात समाजातील अपप्रवृत्तीवर हल्ला असतो. तर सध्या समाजात सुरु असलेल्या अनेक घडामोडींचं बारीक निरीक्षण असतं. त्यावर आघात करत ते विनोद निर्मिती करतात. त्यामुळे त्यांच्या किर्तनाला अलोट गर्दी होते. यावेळी त्यांनी राजकीय सभा आणि कार्यकर्त्यांना असा आरसा दाखवला आहे.

कीर्तनकारांनी 5 हजार जास्त घेतले की...इंदुरीकर महाराजांनी असे घेतले फैलावर
इंदुरीकर महाराजांची पुन्हा टीका
Follow us
| Updated on: Mar 24, 2024 | 11:02 AM

सध्या उन्हासोबतच लोकसभा निवडणुकीचे वातावरण पण तापू लागले आहे. जागा वाटपाचे एकदा फायनल झाल्यावर प्रचाराला जोर चढणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून दावे-प्रतिदावे, डावपेच राज्यातील अवघी जनता पाहत आहे. पण राजकीय धुराळा उठण्यापूर्वीच इंदुरीकर महाराजांनी राजकीय सभांवर निशाणा साधल्याने सर्वांचेच कान टवकारले आहेत. अर्थात इंदुरीकर महाराजांनी कोणत्याही राजकीय पक्षावर टीका केलेली नाही. पण आरसा मात्र दाखवला आहे. काय म्हणाले इंदुरीकर महाराज?

इंदुरीकर महाराजांची राजकीय सभांवर जोरदार टीका

इंदुरीकर महाराज चिमटे काढत वैगुण्य आणि समाजातील वाईट वृत्तीवर तुटून पडतात. त्यांच्या अनेक किर्तनात सध्या समाजात सुरु असलेल्या अनेक विचित्र प्रकारांचा खरपूस समाचार घेतात. यावेळी मात्र त्यांनी राजकीय सभांवर निशाणा साधला. कीर्तनकारांनी ५ हजार रुपये जादा घेतले तर धंदा मांडला अशी टीका होते.मात्र राजकीय सभांना ५ कोटींचा खर्च केला जातो.त्याचे काय? असा रोकडा सवाल त्यांनी केला. त्यांचा रोख कुणावर आहे हे वेगळं सांगायला नको, नाही का?

हे सुद्धा वाचा

इकडं येतात, सभेला आणली जातात

सोलापूर जिल्ह्यातील माढ्यामधील कुंभेज गावात महाराजांचे किर्तन होते. या कार्यक्रमात निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी राजकीय सभांवर वक्तव्य केले. त्यांनी राजकीय सभा आणि किर्तनाची तुलनाच होऊ शकत नसल्याचे स्पष्ट केले. या दोघांमधील फरक पण त्यांनी सांगितला. किर्तनकारांच्या कार्यक्रमाला लोक येतात. सभेला आणली जातात. त्यांना पाण्याच्या बाटल्या- समोसे दिले जातात, असा चिमटा त्यांनी काढला. सभेच्या खर्चावर कोण विचारायला गेला तर त्याचे काय खरं नाही, अशी मिश्कील टिप्पणी देखील त्यांनी केली. सध्या निवडणुकीचे वारे वहत असताना इंदुरीकर महाराज यांच्या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. हा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.

आमच्यावर बाजार मांडल्याचा आरोप

यापूर्वी सुद्धा इंदुरीकर महाराज यांनी त्यांची खदखद व्यक्त केली होती. नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमावरुन त्यांनी टीका केली होती. गौतमी पाटील तीन गाण्यांसाठी तीन लाख रुपये घेते. तर आम्ही फक्त 5 हजार वाढवून मागितले तर बाजार मांडल्याचा आमच्यावर आरोप करण्यात येतो, अशी टीका त्यांनी केली होती. आता राजकीय सभांच्या माध्यमातून इंदुरीकर महाराज यांनी पुन्हा टीका केली आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच..
मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच...
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'.
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्...
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्....
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्...
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्....
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्..
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्...
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल.
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली.
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल.
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?.
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी.