“सर्व स्तराची उन्नती करणारा हा महाराष्ट्रातील इतिहासातील पहिला अर्थसंकल्प”; भाजप खासदाराने अर्थसंकल्पाचे तोंडभरून कौतूक केले

शिंदे-फडणवीस सरकार म्हणजे सर्वसामान्यांचे सरकार आहे. त्यामुळे यावेळी मांडलेला अर्थसंकल्प हा सर्वसमावेश असा आहे.

सर्व स्तराची उन्नती करणारा हा महाराष्ट्रातील इतिहासातील पहिला अर्थसंकल्प; भाजप खासदाराने अर्थसंकल्पाचे तोंडभरून कौतूक केले
Follow us
| Updated on: Mar 09, 2023 | 9:58 PM

सोलापूरः महाराष्ट्राच्या इतिहासातील हा पहिला अर्थसंकल्प असून सर्व स्तराची उन्नती करणारा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली. या अर्थसंकल्पात नांदेड जिल्ह्याचादेखील विचार करण्यात आला असल्याचे सांगत त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांमधून आनंद व्यक्त केला जात आहे. नांदेड ते बिदर या रेल्वे मार्गाची मागणी मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. नांदेड आणि बिदर हे दोन तीर्थक्षेत्र जोडण्यासाठी या अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली आहे.

तर शेतकऱ्यांसाठी आता राज्य शासन 6 हजार रुपये देणार असून सर्व समावेशक असा हा अर्थसंकल्प असल्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सांगत अर्थसंकल्पाचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे त्यांनी आभार मानले आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून नांदेड जिल्ह्यातील अनेक गोष्टीसाठी मागणी करण्यात येत होती. मात्र राज्यात अनेक सरकारं आलीही आणि गेलीही आहेत मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते.

तर आता मात्र शिंदे-फडणवीस यांच्या सरकारने नांदेड तालुक्याकडे लक्ष देत रेल्वे मार्गाची महत्वाची मागणी होती त्यासाठी भरीव तरतूद केल्याचेही त्यांनी सांगितले.

शिंदे-फडणवीस सरकार म्हणजे सर्वसामान्यांचे सरकार आहे. त्यामुळे यावेळी मांडलेला अर्थसंकल्प हा सर्वसमावेश असा आहे.

जनसामान्यांचा विचार केला असल्यामुळे शेतकरी, महिला, युवक, शासकीय, निशासकीय, शिक्षण, सहकार आणि अर्थकारणाला चालना देण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने या अर्थ संकल्पातून मोठे बळ दिले असल्याची प्रतिक्रियाही प्रताप पाटील-चिखलीकर यांनी दिली.

यावेळी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी आणि राज्यातील सर्व भागातील विकासासाठी भरीव तरतूद केली गेली आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प हा महाराष्ट्राच्या इतिहासातील वेगळा अर्थसंकल्प असल्याचेही त्यांनी यावेळी सांगतिले आहे.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.