AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray | ‘तुम्ही नामर्दाप्रमाणे रात्री बॅनर फाडता, पण…’, ठाकरे गट खवळला, थेट इशारा

Uddhav Thackeray | "ठाणे हे एकनाथ शिंदे यांच्या बापाचे नाही. ठाण्यातील शिवसैनिक एकनाथ शिंदेंची मस्ती उतरवतील. त्यासाठी उद्धव ठाकरेंची गरज नाही" असं शरद कोळी यांनी म्हटलं आहे.

Uddhav Thackeray | 'तुम्ही नामर्दाप्रमाणे रात्री बॅनर फाडता, पण...', ठाकरे गट खवळला, थेट इशारा
uddhav thackerayImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 11, 2023 | 12:13 PM
Share

सोलापूर : मुंब्र्यात लावण्यात आलेले उद्धव ठाकरे यांचे बॅनर फाडण्यात आले आहेत. त्यावरुन आता शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटात शाब्दीक लढाई सुरु झाली आहे. दोन्ही गटांकडून परस्परांची लायकी काढण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात मुंब्र्यातील ठाकरे गटाची शाखा बुलडोझर लावून तोडण्यात आली होती. आज दुपारी उद्धव ठाकरे मुंब्र्यात येणार आहेत. त्याआधी दोन्ही गटाकडून आक्रमक भाषा सुरु आहे. “संजय राऊत तुमची लायकी काय ? हे महाराष्ट्राला माहित आहे. सिलवर ओकच्या बाहेरील द्वारपाल. सिलवर ओकचा पगारी नोकरी ही त्यांची स्वत:ची लायकी आहे” अशा शब्दात नरेश म्हस्के यांनी घणाघाती टीका केलीय. ते शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत.

त्यांच्या या टीकेला आता ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी प्रत्युत्तर दिलय. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या जीवावर बॅनर फाडणाऱ्यांची मस्ती ठाण्यातील शिवसैनिक उतरवणार. समोरासमोर लढण्याची ताकद तुमच्या मनगटात नाही म्हणून तुम्ही रात्री बॅनर फाडता” असं शरद कोळी यांनी म्हटलय. “तुम्ही नामर्दाप्रमाणे रात्री बॅनर फाडता. पण शिवसैनिक तुम्हाला दिवसा फडल्याशिवाय राहणार नाही. ठाणे हे तुमच्या किंवा एकनाथ शिंदे यांच्या बापाचे नाही तर शिवसैनिकांचे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे आहे” असं शरद कोळी म्हणाले.

‘तुम्हाला पुन्हा रिक्षा चालवावी लागेल’

“मस्ती आलेल्या बोकडाप्रमाणे माजला आहात. पण मरीमाई यात्रेवेळी माजलेल्या बोकडाला कापले जाते. ठाण्यातील शिवसैनिक एकनाथ शिंदेंची मस्ती उतरवतील. त्यासाठी उद्धव ठाकरेंची गरज नाही. शिवसैनिकांनी मस्ती उतरल्यावर तुम्हाला पुन्हा रिक्षा चालवावी लागेल” असं शरद कोळी यांनी म्हटलय.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.