AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vitthal Rukmini : नवदाम्पत्याला विठुरायाचे थेट दर्शन; रांगेत उभे राहण्याची नाही गरज, मंदिर समितीचा अजून एक मोठा निर्णय

Pandharpur Temple Visit : विठ्ठल मंदिरात नवदांपत्याला आता थेट दर्शन मिळणार आहे. पंढरपूर येथे नवदाम्पत्य सुखी आयुष्यासाठी विठुरायाच्या दर्शनाला येतात. त्यांना दर्शनासाठी अनेकदा तासन तास उभं राहावं लागतं. या निर्णयाने अनेकांना दिलासा मिळाला आहे.

Vitthal Rukmini : नवदाम्पत्याला विठुरायाचे थेट दर्शन; रांगेत उभे राहण्याची नाही गरज, मंदिर समितीचा अजून एक मोठा निर्णय
मंदिर समितीचा मोठा निर्णय
| Updated on: Jan 29, 2025 | 9:23 AM
Share

राज्यभराच्या अनेक भागातून नवीन लग्न झाले की नवदांपत्य विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात येतात. आलेल्या नवदंपत्याला गेल्या अनेक वर्षापासून मंदिरात थेट दर्शन देण्याची व्यवस्था मंदिर प्रशासनाने केली होती. मात्र हीच घोषणा आज मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी पुन्हा एकदा केली. विशेष म्हणजे केवळ नवदाम्पत्यच नाही तर त्यांच्यासोबत आलेल्या तीन लोकांसह थेट दर्शन दिले जाणार आहे. या निर्णयाचे राज्यभरातून स्वागत होत आहे. अनेक जण राज्यातील कोनाकोपर्‍यातून दर्शनासाठी येतात. नवदाम्पत्याला दर्शनासाठी तासन तास लागतात. आता पंढरपूरात वेळ वाचणार असल्याने त्यांना इतर धार्मिक स्थळांना सहज भेट देता येणार आहे.

VIP दर्शनाला फाटा

या 8 फेब्रुवारी रोजी माघ यात्रा आहे. त्यासाठी मंदिर समितीची बैठक झाली. या बैठकीत आषाढी आणि कार्तिकी या महायात्रांप्रमाणेच माघी वारीत सुद्धा भाविकांना तशाच सुविधा दिल्या जाणार असल्याचे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले. माघ यात्रा काळात ऑनलाइन आणि व्हीआयपी दर्शन हे पूर्णपणे बंद राहणार आहे. भाविकांना जलद दर्शन होण्यासाठी सहा पत्रा शेड उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.

पंढरपूरकरांना मोठा दिलासा

पंढरपूर शहरातील नागरिकांसाठीही आता सकाळी 6 ते 7 आणि रात्री 10 ते 10:30 या वेळात आता थेट दर्शन दिले जाणार आहे . यापूर्वी स्थानिक नागरिकांसाठी सकाळी 6 ते 6:30 एवढाच वेळ दर्शनासाठी असायचा. आज झालेल्या बैठकीत ही वेळ वाढविण्यात आल्याने स्थानिक नागरिकांनाही विठुरायाचे दर्शन सुलभ रीतीने होणार आहे.

दिव्यांगासाठी विशेष व्यवस्था

विठुरायाच्या दर्शनासाठी येणारे अंध, अपंग, दिव्यांग आणि चालता न येणारे अतिवृद्ध यांना झटपट दर्शन दिले जाणार आहे. यासाठी व्हील चेअर ची व्यवस्था केली जाणार आहे. अंध , अपंगांसोबत आता नवविवाहितांनाही झटपट दर्शनाचा आनंद घेता येणार आहे. विठुरायाच्या दर्शन रांगेत मृत्यू झालेल्या भाविकांना एक लाख रुपयाची आर्थिक मदत व मृतदेह गावापर्यंत नेण्याचा खर्चही आता मंदिर समिती उचलणार असल्याचे औसेकर यांनी सांगितले.

संवर्धन कामावर पुजारी नाराज

श्री.तुळजाभवानी मंदिरात संस्थांच्या स्वनिधीतून सुरु असलेल्या 58 कोटी रुपयांच्या जतन व संवर्धनाच्या कामात पुरातत्त्व विभागाकडून मनमानी होत असल्याचा आरोप पुजार्‍यांनी केला आहे. पुरातत्त्व विभागाची मनमानी थांबून संत गतीने सुरू असलेले काम जलद गतीने करून कामामध्ये योग्य ती बदल करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पुजाऱ्यांनी निवेदन दिले. पुरातत्त्व विभागाच्या मनमानीच्या विरोधात 6 फेब्रुवारी रोजी लाक्षणिक उपोषण करण्याचा इशाराच पुजारी मंडळाने दिला आहे.

श्री तुळजाभवानीच्या मुख्य गाभाऱ्यातील तडे गेलेल्या शिळांच्या कामांना मंजुरी देण्याबाबत विलंब केल्याचा आरोप पुजारी मंडळाने केला आहे. भाविकांना मंदिरातून बाहेर पडण्यासाठी देवीच्या पलंगाच्या दोन्ही बाजूने दरवाजा करण्याची पुजारी मंडळाने मागणी केली आहे.

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.