Sadabhau Khot : वाघाला दगड मारला तर तो नरडीचा घोट घेतो; हॉटेलमालकानं ताफा अडवल्याप्रकरणी सदाभाऊ खोतांचा राष्ट्रवादीला इशारा

| Updated on: Jun 17, 2022 | 10:44 AM

सातत्याने राष्ट्रवादीचे नेते लक्ष्य करत असल्याची तक्रार गृहमंत्री, मुख्यमंत्री त्याचबरोबर देवेद्र फडणवीस यांच्याकडेदेखील याविषयी तक्रार करणार आहे. राष्ट्रवादी गुन्हेगारांना पाठीशी घालत असून असले कुभांड रचून आम्हाला आयुष्यातून उठवण्याचा डाव कधीच यशस्वी होऊ देणार नाही, असे सदाभाऊ खोत म्हणाले.

Sadabhau Khot : वाघाला दगड मारला तर तो नरडीचा घोट घेतो; हॉटेलमालकानं ताफा अडवल्याप्रकरणी सदाभाऊ खोतांचा राष्ट्रवादीला इशारा
सदाभाऊ खोत
Image Credit source: tv9
Follow us on

सोलापूर : कुत्र्याला दगड मारला तर तो दगडाचा चावा घेतो. मात्र वाघाला दगड मारला तर तो नरडीचा खोट घेतो, असे म्हणत सदाभाऊचा प्राण गेला तरी चालेल. मात्र तुमचा मस्तवाल वाडा पाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी राष्ट्रवादीला दिला आहे. ते सोलापुरात बोलत होते. सदाभाऊ खोतांनी बिल दिले नाही, म्हणून हॉटेलमालकाने खोतांचा ताफा अडवला होता. याप्रकरणी सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीवर (NCP) टीका केली आहे. राष्ट्रवादीकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. तर टोमॅटोसारखे गाल असणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्याला सांगू इच्छितो, की मी कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही, असा घणाघात खोतांना राष्ट्रवादीवर केला. यासंबंधी तक्रार (Complaint) करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वाचली गुन्ह्यांची यादी

ते पुढे म्हणाले, की संबंधित व्यक्तीचे हॉटेलच नाही. अशोक शिनगारे याला मी ओळखतच नाही. शिनगारे या व्यक्तीचे हॉटेलच नाही, असा दावा खोत यांनी केला. 2014नंतर 20 ते 25वेळा सांगोल्याचा दौरा केला, मात्र ही व्यक्ती कधीही भेटली नाही. कोण-कोण जेवले याविषयी त्याला काहीच माहिती त्याला नव्हती. मात्र गोंधळ घातला त्यावेळी सर्व मीडिया त्याठिकाणी सज्ज होता, असे म्हणत अशोक शिनगारे गुन्हेगार असल्याचा आरोप त्यांनी केला. कर्नाटकमध्ये चोरीचा गुन्हा दाखल आहे. 2021मध्येही त्याच्यावर गुन्हा दाखल, 420, 138 नुसारही त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. यासह विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती खोतांनी दिली. यामागे सूत्रधार कोण, याची माहिती घेतली, असे खोत म्हणाले.

‘वाडा विरुद्ध गावगाडा असा हा संघर्ष’

त्याच्या फोनवर कोणाचे संभाषण झाले, कोण कोण यात सहभागी आहे, याचे फोन रेकॉर्ड तपासावे. 353खाली गुन्हा पोलिसांनी दाखल करायला हवा होता. मात्र पोलीस गुन्हा दाखल करायला तयार नव्हते. मात्र तो माफी मागत आहे तर कशाला गुन्हा दाखल करायचा, असे पोलिसांचे म्हणणे होते. सातत्याने राष्ट्रवादीचे नेते लक्ष्य करत असल्याची तक्रार गृहमंत्री, मुख्यमंत्री त्याचबरोबर देवेद्र फडणवीस यांच्याकडेदेखील याविषयी तक्रार करणार आहे. राष्ट्रवादी गुन्हेगारांना पाठीशी घालत असून असले कुभांड रचून आम्हाला आयुष्यातून उठवण्याचा डाव कधीच यशस्वी होऊ देणार नाही. 21, 22 तारखेला कार्यकारिणी आम्ही बोलावली आहे. आता संघर्ष अटळ आहे, असा इशारा त्यांनी दिला. वाडा विरुद्ध गावगाडा असा हा संघर्ष असेल, असे ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

गुन्हा दाखल

हॉटेल मालक अशोक शिनगारे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सांगोला पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झाला आहे. पंचायतराज समिती दौऱ्यावर असताना सदाभाऊ खोत यांचा ताफा अडवल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादंवि 341, 186 आणि 104 कलमानुसार पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला.