संजय राऊत भविष्य सांगणारा पोपट, शहाजी बापू पाटलांचा जहरी टोला, म्हणाले त्यांच्या सगळ्या चिठ्ठ्या…

Shahaji Bapu Patil on Sanjay Raut : माजी आमदार शहाजी पाटील यांनी पुन्हा एकदा खासदार संजय राऊत यांना लक्ष्य केले आहे. संजय राऊत म्हणजे भविष्य सांगणारा पोपट असल्याचा जहरी टोला त्यांनी लगावला. त्यांनी राऊतांवर टीकेची झोड उठवली.

संजय राऊत भविष्य सांगणारा पोपट, शहाजी बापू पाटलांचा जहरी टोला, म्हणाले त्यांच्या सगळ्या चिठ्ठ्या...
संजय राऊत,शहाजीबापू पाटील
| Updated on: Aug 17, 2025 | 11:25 AM

माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. यापूर्वी सुद्धा बापूंनी राऊतांवर टीकेची झोड उठवली होती. मनसे आणि उद्धव ठाकरे शिवसेना एकत्र येत असल्यावर त्यांनी फिरकी घेतली. ठाकरे बंधू एकत्र येण्याचा कुठलाच परिणाम होणार नसल्याचा दावा पाटील यांनी केला. गुवाहाटी येथील निसर्ग सौंदर्याविषयीचा त्यांचा डॉयलॉग तेव्हा खूपच गाजला होता.

विजय महायुतीचाच

दोन ठाकरे बंधू एकत्र आले म्हणून राजकीय दृष्ट्या महानगरपालिका निवडणुकीत कोणताही परिणाम होणार नाही. मुंबई, ठाणे, नाशिक अशा प्रमुख महानगरपालिकेवर महायुतीचाच विजय होणार हे निश्चित आहे, असा विश्वास माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी व्यक्त केला. दोन्ही बंधू एकत्र येण्याचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कुठलाच परिणाम होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

राऊत भविष्य सांगणारा पोपट

यावेळी शहाजीबापू पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर जहरी टीका केली. संजय राऊत भविष्य सांगणारा पोपट आहे, असा चिमटा त्यांनी काढला. पण आत्तापर्यंत राऊतांनी काढलेल्या सगळ्या चिट्ट्या खोट्या ठरल्या आहेत. त्यामुळे असला पोपट उद्धव ठाकरे यांनी लवकरच पिंजऱ्यात बंद करून टाकावा असा टोला माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी लगावला.

धनखड यांच्यावरून टोलेबाजी

धनखड यांना कुठे लपवून ठेवले आहे, यावरून संजय राऊतांनी टीका केली होती. त्याचा समाचार शहाजी बापू पाटील यांनी घेतला. तुम्ही पटदिशी जा आणि त्यांना हुडकून काढा. हा विजय भाजपचा आहे. धनखड आजारी आहेत. तुम्ही कशाला मध्येच लुडबूड करताय. उद्धव ठाकरे यांच्याजवळ सुखाने भाजीभाकर खा असा टोला शहाजीबापूंनी राऊतांना लगावला.

एकनाथ शिंदेंमुळे महायुतीला मोठे यश

एकनाथ शिंदे हे ठाण्याचे नेते आहेत का राज्याचे नेते आहेत हे त्यांनी काल झालेल्या निवडणुकीत दाखवून दिलं आहेय मुख्यमंत्री म्हणून विधानसभेला शिंदे यांचा चेहरा होता म्हणून इतर राज्यापेक्षा महाराष्ट्र राज्यात महायुतीला बहुमत मिळाले असल्याचा दावाही शहाजी बापू पाटील यांनी केला.

संजय राऊत यांनी महाराष्ट्रात खेडेपाड्यात जाऊन बघावं एकनाथ शिंदे हे ठाण्याचे नेते आहेत का राज्याचा नेता आहे सकाळी नऊ वाजता नारळाच्या झाडाखाली बोलणार साडेनऊला घरात जाणार याला काय समजणार अशीही टीका माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी राऊत यांच्यावर केली. संजय राऊत हा आमच्या मतावर निवडून आलेला खासदार आहे. बेडका सारखा फुगून झालेला बैल आहे नरेंद्र मोदी यांच्यावर बोलण्याएवढा हा नेता मोठा नाही, अशी टीका त्यांनी केली.

शिंदे यांना नशिबाने लॉटरी लागली नाही तर कष्टानी हे मुख्यमंत्रीपद मिळवलं आहे दिवस रात्र कष्ट करण्याची त्यांची प्रवृत्ती आहे. एकनाथ शिंदे यांना खऱ्या अर्थाने आनंद दिघे यांनी नेता केले आणि बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना आशीर्वाद एकनाथ शिंदे यांना बाळासाहेब ठाकरे यांनी नाही तर उद्धव ठाकरे यांनी नेता केले असे उत्तर शहाजीबापू पाटील यांनी दिले.