मोठी बातमी! मालगाडीचं इंजिन थेट शेतात घुसलं! सोलापूरच्या करमाळ्यात मोठा रेल्वे अपघात, हादरवणारी दृश्य समोर

सोलापूरच्या करमाळ्यात मालगाडीचा अपघात झालाय. मालगाडीचं इंजिन थेट शेतात घुसल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मोठी बातमी! मालगाडीचं इंजिन थेट शेतात घुसलं! सोलापूरच्या करमाळ्यात मोठा रेल्वे अपघात, हादरवणारी दृश्य समोर
मालगाडीचा अपघात
Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Sep 04, 2022 | 12:11 PM

सोलापूर : सोलापूरच्या (Solapur train accident) करमाळ्यात एका मालगाडीचा अपघात झाला. मालगाडीचं इंजिन थेट शेतात घुसल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र मालगाडीचं (Good Trains Accident) नुकसान झालं. मालगाडीचे डबेही रेल्वे रुळावरुन घसरल्याचं पाहायला मिळालंय. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातल्या केम (Kem, Karmala Taluka, Solapur) गावाजवळ मालवाहतूक करणाऱ्या रेल्वेचा अपघात झाला होता. मालवाहू गाडीचे रेल्वे इंजिन थेट शेतात घुसल्याचे पाहायला मिळालं. आज सकाळच्या सुमारास केम या गावाजवळील शेतात सिमेंट भरलेल्या रेल्वेचे इंजिन रूळ सोडून थेट शेतात घुसले.

सुदैवाने शेतात लोकवस्ती किंवा व्यक्ती नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र रेल्वे इंजिन रुळावरून खाली घसरल्याने काही रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक बिघडले आहे. आता ही रेल्वे वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्नही सुरु आहेत.

पाहा LIVE घडामोडी

बचावकार्य सुरु

सोलापूरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मालगाडीला हा अपघात झालाय. हा अपघात नेमका कुणाच्या चुकीने झाला, याचाही आता तपास केला जाईल. मात्र सध्या अपघातग्रस्त रेल्वेतील सामान, रेल्वेरुळावरुन घसरलेले डबे आणि इतर यंत्रणा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. रेल्वेचे अधिकारी आणि बचाव पथकाकडून पुढील गोष्टी सुरळीत व्हाव्यात, यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत.

थोडक्यात मोठा अनर्थ टळला

या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. सुदैवानं ही मालगाडी असल्यानं यात कोणतेही प्रवासी नव्हते. अन्यथा मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होता. मात्र थोडक्यात मोठा अनर्थ टळला आहे. असं असलं तरी आर्थिक नुकसान झालंय. मालवाहू ट्रेनमध्ये सिमेंट असल्याची माहिती मिळतंय.

आता या अपघातानंतर या मालगाडीच्या चालकासोबत मालगाडी वाहून नेणाऱ्या कर्मचाऱ्यांशी चर्चा करुन नेमकं काय घडलं, याबाबत अधिक माहिती घेतली जातेय. रेल्वे प्रशासनाकडून मालगाडीचं इंजिन नेमकं शेतात कसं घुसलं, याचा तपास करण्यासाठी चौकशीही सुरु करण्यात आली आहे. या चौकशीतून नेमकी काय माहिती समोर येते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.