AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रणिती शिंदेच्या विधानसभा मतदारसंघात कोण लढणार?; म्हणाल्या, सोलापूर शहरात…

MP Praniti Shinde on Vidhansabha Election 2024 : काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूरमध्ये आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीवर भाष्य केलं. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून कोण उमेदवार असेल? यावर त्यांनी भाष्य केलं आहे. वाचा...

प्रणिती शिंदेच्या विधानसभा मतदारसंघात कोण लढणार?; म्हणाल्या, सोलापूर शहरात...
प्रणिती शिंदे, खासदारImage Credit source: Facebook
| Updated on: Sep 28, 2024 | 12:21 PM
Share

काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांनी 2024 ला लोकसभेची निवडणूक लढवली. भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचा पराभव करत प्रणिती यांनी ही निवडणूक जिंकली. सध्या त्या सोलापूरच्या खासदार आहेत. प्रणिती शिंदे लोकसभेवर गेल्याने सोलापूर शहर मध्य हा विधानसभा मतदारसंघ रिक्त झाला. आता काहीच दिवसात विधानसभेची निवडणूक होणार आहे. अशाच या मतदारसंघात कोण उमेदवार असेल. याची चर्चा सोलापूरच्या राजकीय वर्तुळात होत आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रणिती शिंदे यांनी यावर भाष्य केलं आहे.

प्रणिती शिंदे काय म्हणाल्या?

रिक्त झालेल्या सोलापूर शहर मध्यच्या जागेवरून काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांचे स्पष्ट भाष्य केलं आहे. सोलापूर शहर मध्यची जागा काँग्रेस पक्षाचा एकनिष्ठ असलेला एक कार्यकर्ता लढणार आहे. महाविकास आघाडीचे चर्चा वाटप होईलच. पण मी माझं मात मांडलं आहे, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या.

महिला मुख्यमंत्री होणार?, म्हणाल्या…

महाराष्ट्राला अद्यापपर्यंत महिला मुख्यमंत्री लाभलेल्या नाहीत. यावेळी महिला मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा आपल्या देशातील कोणत्याही राज्यात महिला मुख्यमंत्री झाल्यास त्याचा आंनद आणि अभिमान आहे. महिलांना संधी मिळावी म्हणून काँग्रेसने महिलांना 50 टक्के आरक्षण दिले. मुख्यमंत्री कोण असणार हे आम्ही नंतर पाहू मात्र आम्ही राज्याला स्थिर सरकार देणार आहोत, असं प्रणिती म्हणाल्या.

देश तोडण्याचा कितीही प्रयत्न केला तरी देश एकसंध आहे. आपला देश सेक्युलर आहे. देशात किती हे ध्रुविकरण दमले पेटवण्याचा प्रयत्न केला तरी ते यशस्वी होणार नाही. आमच्या महाराष्ट्राच्या एकीला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जात असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. त्यामुळे आम्ही एकत्र येत सॉलिड सरकार देण्याचा प्रयत्न करणार आहोत, असं प्रणिती शिंदे यांनी या पत्रकार परिषदेत म्हटलं. विमानतळाचं उद्घाटन रद्द झाल्यानंतर हे आमदार कसली पाहणी करत आहेत. आधी एक आमदार पाहणी करतात. नंतर दोन आमदार जातात म्हणजे नक्की काय करत आहेत. भाजपचे दोन आमदार सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख यांनी विमानतळाची पाहणी केली, असंही त्या म्हणाल्या.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.