Solapur Crime : सोलापुरात तलवार, कोयत्यानं तरुणावर जीवघेणा हल्ला! भरदिवसा रस्त्यातच सपासप वार

हल्ला नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा शोध आता पोलिसांकडून (Solapur Police) घेतला जातो आहे.

Solapur Crime : सोलापुरात तलवार, कोयत्यानं तरुणावर जीवघेणा हल्ला! भरदिवसा रस्त्यातच सपासप वार
जीवघेणा हल्ला...
Image Credit source: TV9 Marathi
सागर सुरवसे

| Edited By: सिद्धेश सावंत

Jun 20, 2022 | 12:06 PM

सोलापूर : सोलापुरात (Solapur Crime News) दिवसाढवळ्या एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. सहा ते सात जणांनी मिळून एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला (Attempt to murder) केला. या हल्ल्यामध्ये तरुण गंभीर जखमी झालाय. या हल्ल्यामागचं नेमकं कारण काय होतं, हे कळू शकलेलं नाही. हल्ला नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा शोध आता पोलिसांकडून (Solapur Police) घेतला जातो आहे. मुळेगाव रोड इथं दिवसाढवळ्या हा हल्ला करण्यात आला होता. दरम्यान, या हल्ल्यानंतर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. या हल्लाप्रकरणी चौकशीसाठी आता दोन पथकं तैनात करण्यात आली आहे. या पथकांच्या मदतीनं आता तपास केला जातोय. तर जखमी झालेल्या तरुणावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.

नेमकं काय घडलं?

शुभम स्वारी असं हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे. तो बाईकवरुन हैदराबाद रोडवरुन घरी जात होता. त्यावेळी मुळेगाव रोड इथं सहा ते सात जणांनी शुभमला घेरलं आणि त्याच्यावर हल्ला केला. कोयत्यानं शुभमवर सपासप वार करण्यात आल्याची माहिती त्याच्या शुभमच्या मित्राने दिली. या हल्ल्यामध्ये त्याच्या डोक्याला, हाताला आणि पोटाला गंभीर जखम झाली. जखमी शुभमला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

हल्ल्याचं कारण काय?

सुरुवातील शुभमला शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं होतं. त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालायत भरती करण्यात आलं. रात्री उशीरा सोलापूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. पूर्ववैमन्स्यातून शुभमवर जीवगेणा हल्ला करण्यात आला असल्याचा संशय व्यक्त केला जातोय.

हे सुद्धा वाचा

हल्लेखोरांचा शोध सुरु

आता सोलापूरच्या एमआयडीसी पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी दोन पथकं तैनात केली आहे. तसंच सोलापूरबाहेर ही पथकं पुढील तपासासाठी रवाना झाली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक राजन माने यांनी दिलीय. एमआयडीसी पोलीस या हल्लाप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें