AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sangola | एकाच व्यासपीठावर शरद पवार-देवेंद्र फडणवीस रमले हास्य-विनोदात

Sangola | "एकही दिवस सुट्टी न घेणारा, पावणे अकरा वाजता सभागृहात पहिले येणारे आणि सर्वात शेवटी जाणारे आमदार म्हणजे आबासाहेब देशमुख हे होते" असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Sangola | एकाच व्यासपीठावर शरद पवार-देवेंद्र फडणवीस रमले हास्य-विनोदात
Shara pawar-Devendra fadnavis
| Edited By: | Updated on: Aug 13, 2023 | 4:36 PM
Share

सोलापूर : आज स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या पुतळ्याच सांगोल्यात अनावरण झालं. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र आले. परस्परांचे राजकीय विरोधक असलेले दोन्ही नेते या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्टेजवर एकत्र आले. पुतळ्याच्या अनावरणानंतर एक सभा झाली. या सभेत दोन्ही नेते काय बोलणार? याची उत्सुक्ता लागली होती. दरम्यान कार्यक्रमाच्या निमित्ताने स्टेजवर देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार हास्य विनोदात रमलेले पहायला मिळाले. या कार्यक्रमाला जयंत पाटील सुद्धा उपस्थित होते.

शरद पवार यांच्याआधी देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केलं. त्यावेळी फडणवीस यांनी गणपतराव देशमुख यांच्या आठवणींना उजाळा दिला.

सुरक्षा सोडून एसटीने गावाकडे आलेले आमदार म्हणजे आबासाहेब

“गणपतराव देशमुख यांच्या पुतळ्याच अनावरण करण्याचा योग मला आला. आम्ही त्यांना म्हणायचो की, आबासाहेब तुमच्या 100 व्या जन्मदिनाचा कार्यक्रम आम्ही विधी मंडळात साजरा करणार आहोत. पण दुर्देवाने ते आपल्यात नाही याची खंत वाटते. परिवर्तन हा संसाराचा नियम आहे, पण संसारात काही गोष्टी असतात त्यात परिवर्तन होतं नाही. राजकारणातील शाश्वत सत्य म्हणजे आबासाहेब. 1980 साली इंदिरा गांधी यांनी शरद पवार यांचं सरकार बरखस्त केल्यावर मंत्रिपदाचे सर्व गाडी, सुरक्षा सोडून एसटीने गावाकडे आलेले आमदार म्हणजे आबासाहेब” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

एकही दिवस सुट्टी न घेणारा आमदार

“महाराष्ट्राच्या दुष्काळाची दाहकता, दुष्काळाच दुखणं आम्हाला गणपतराव देशमुखांमुळे समजले. महाराष्ट्राच्या विधानसभेत एकही दिवस सुट्टी न घेणारा, पावणे अकरा वाजता सभागृहात पहिले येणारे आणि सर्वात शेवटी जाणारे आमदार म्हणजे आबासाहेब देशमुख हे होते. आबासाहेब म्हणजे वन मॅन आर्मी होते. सभागृहात असताना त्यांनी हात वर केला की सर्वजण शांत व्हायचे” अशी आठवण देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली. ‘संस्था या आपल्या मालकीच्या नसून जनतेच्या आहेत’

“सूतगिरणी ज्याप्रकारे प्रामाणिकपणे चालवली तशी सूतगिरणी कुणीही चालवली नाही. आर्थिक अनियमितता होऊन एकदाही सूतगिरणी बंद पडली नाही. कारण संस्था या आपल्या मालकीच्या नसून जनतेच्या आहेत असे मानून काम करायचे” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?