बॉयरलचे गरम पाणी अंगावर पडले; कारखान्यात काम करणारे दोन कामगार जखमी

कमलाई साखर कारखाना येथे काम करीत असताना बॉयलरचे पाणी अंगावर पडल्याने हे कामगार जखमी झाले आहेत. त्यांना करमाळा येथे दाखल करण्यात आले होते. मात्र येथून त्यांना रेफर करून तीन वाजताच्या सुमारास सोलापूर येथे दाखल केले आहे.

बॉयरलचे गरम पाणी अंगावर पडले; कारखान्यात काम करणारे दोन कामगार जखमी
Follow us
| Updated on: Mar 06, 2023 | 5:14 PM

सोलापूर : करमाळा तालुक्यातील कमलाई साखर कारखाना येथे काम करताना दोन कामगार जखमी झाले आहेत. राजेंद्र रामचंद्र नलवडे (वय 49, रा. करमाळा) व बबलू कुमार (वय ३०) अशी जखमींची नावे आहेत. बॉयलरचे गरम पाणी अंगावर पडल्याने हे कामगार जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सोलापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत. आज सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. कमलाई साखर कारखाना येथे काम करीत असताना बॉयलरचे पाणी अंगावर पडल्याने हे कामगार जखमी झाले आहेत. त्यांना करमाळा येथे दाखल करण्यात आले होते. मात्र येथून त्यांना रेफर करून तीन वाजताच्या सुमारास सोलापूर येथे दाखल केले आहे.

गरम पाणी अंगावर पडले

या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. कारखाना बंद करताना हा प्रकार झाला असल्याचे समजत आहे. कारखाना व्यवस्थापनाशी याबाबत संपर्क साधला मात्र अधिकृतपणे यावर कोणीही माहिती दिलेली नाही. साखर कारखान्यात नेहमीप्रमाणे कामगार कामावर गेले होते. काम करत असताना बॉयलरचे गरम पाणी त्यांच्या अंगावर पडले. त्यामुळे ते भाजल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दोन्ही जखमींवर उपचार सुरू

आज सकाळी साडेदहाच्या सुमारात ही घटना घडली. त्यानंतर जखमी कामगारांना रुग्णालयात करमाळा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार केल्यानंतर दोन जखमींना सोलापूर येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले. दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. परंतु, कारखाना व्यवस्थापनाने यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.