Sunetra Pawar Emotional : अजितदादांच्या निधनानंतर सोमेश्वरची पहिलीच निवडणूक; सुनेत्रा पवार भावूक; सभासदांना कोणता शब्द दिला?

सोमेश्वर कारखान्याचा विकास अधिक वेगाने करण्याचा आमचा विचार आहे, या निवडणुकीत कोण प्रामाणिक काम करत आहे याची नोंद घेतली जाईल, असं सुनेत्रा पवारांनी म्हटलं आहे.

Sunetra Pawar Emotional : अजितदादांच्या निधनानंतर सोमेश्वरची पहिलीच निवडणूक; सुनेत्रा पवार भावूक; सभासदांना कोणता शब्द दिला?
Sunetra Pawar Emotional
Image Credit source: social media
| Updated on: Oct 09, 2026 | 10:24 PM

विक्रम वरे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, बारामती : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भावूक झाल्या. अजितदादांच्या निधनानंतरची ही पहिलीच निवडणूक असून, त्यांच्या आठवणींना उजाळा देताना सुनेत्रा पवार यांनी सभासदांना भावनिक साद घातली. दादांची जबाबदारी आता माझी आहे. तुमच्या मनात कोणतीही शंका असेल तर काळजी करू नका, असा शब्द त्यांनी सभासदांना दिला. बारामतीमध्ये मी संयमी आणि शांत आहे, याचा अर्थ मी कमजोर नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी अजितदादा पवार पॅनेलच्या सांगता सभेत त्या बोलत होत्या. यावेळी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि आमदार विजय शिवतारे उपस्थित होते.

Loading...

‘दादांनी रडायचं नाही, लढायचं शिकवलं’

सुनेत्रा पवार म्हणाल्या, सोमेश्वर कारखाना आपल्या कुटुंबाच्या प्रपंचाचा आधार आहे. सोमेश्वरची प्रगती म्हणजे आपल्या सर्वांची प्रगती आहे. दादांना जाऊन आठ महिनेही उलटले नाहीत आणि त्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. दादांच्या निधनानंतर आपण पोरके झालो आहोत. मात्र, दादांनी आपल्याला रडायचं नाही, लढायचं शिकवलं. प्रचारासाठी कार्यक्षेत्रात फिरताना प्रत्येकाच्या मनात आणि घरात दादांच्या आठवणी दिसल्या. तुम्ही दादांवर केलेल्या प्रेमाचं कर्ज फेडल्याशिवाय राहणार नाही, असं त्या म्हणाल्या.

‘दादांच्या नावाचं भांडवल केलं नाही’

विरोधकांवर टीका करताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, मी आणि माझ्या कुटुंबाने दादांच्या निधनाचं भांडवल केलेलं नाही. विरोधक दादांचं नाव घेतल्याशिवाय प्रचार करू शकत नसतील, तर त्यांनी स्वतःच्या कामावर प्रचार करायला हवा होता. कारखाना ही कुणा एकाची मालमत्ता नसून सभासदांची मालमत्ता आहे.

दादांच्या विचारांवर आणि विकासाच्या मार्गावर कारखान्याची पुढील वाटचाल होईल. ऊस उत्पादन वाढीसाठी समिती स्थापन करून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील. सभासदांनी नातेसंबंध बाजूला ठेवून कारखान्याच्या हिताचा विचार करावा आणि अजितदादा विकास पॅनेलला विजयी करावं, असं आवाहन त्यांनी केलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us