AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘कोरोनाची लाट नव्हे, ही तर त्सुनामी’, मग एकट्या महाराष्ट्राच्या नावाने बोंब का?

आता संपूर्ण देशच कोरोनाच्या हॉटस्पॉटकडे जातोय. देशात कोरोना किती वेगानं वाढतोय, याचे आकडे पाहिले तर, ही दुसरी लाट नव्हे, तर त्सुनामी आहे, यावर तुमचा विश्वास बसेल.

'कोरोनाची लाट नव्हे, ही तर त्सुनामी', मग एकट्या महाराष्ट्राच्या नावाने बोंब का?
भारतात कोरोनाच्या नव्या विषाणूने शिरकाव केलाय. हा विषाणू ट्रिप म्युटंट असल्याचं समोर आलंय. त्याचाच परिणाम म्हणून देशभरात कोरोना संसर्ग होणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या नव्या कोरोना विषाणूचा सर्वात मोठा फटका महाराष्ट्राला बसलाय. महाराष्ट्रात नुकत्याच गेलेल्या जीनोम सिक्वेंसिंगमधून या नव्या विषाणूची आकडेवारी समजलीय. यानुसार नव्या कोरोना बाधित रुग्णांमध्ये 60 टक्के रुग्ण या नव्या कोरोना विषाणूमुळे बाधित झाले आहेत.
| Updated on: Apr 17, 2021 | 2:43 AM
Share

मुंबई : कालपर्यंत फक्त एकट्या महाराष्ट्राच्या नावानं बोंबाबोंब होती. मात्र, आता संपूर्ण देशच कोरोनाच्या हॉटस्पॉटकडे जातोय. देशात कोरोना किती वेगानं वाढतोय, याचे आकडे पाहिले तर, ही दुसरी लाट नव्हे, तर त्सुनामी आहे, यावर तुमचा विश्वास बसेल. उत्तर प्रदेशात 1 एप्रिलला 1198 रुग्ण निघाले. 5 एप्रिलला 4136, 10 एप्रिलला 9587 आणि 16 एप्रिलला 22 हजार 339 रुग्ण आढळले (Special report on Maharashtra corona and world situation).

गुजरातमध्ये 1 एप्रिलला 2360 रुग्ण निघाले, 5 एप्रिलला 2845, 10 एप्रिलला 4541 आणि 16 तारखेला 7410 रुग्ण आढळले. राजधानी दिल्लीत 1 एप्रिलला 1819 रुग्ण सापडले. 5 एप्रिलला 4033, 10 एप्रिलला 8521 आणि 16 एप्रिलला 16, 699 रुग्ण आढळले. राजस्थानमध्ये 1 एप्रिलला फक्त 906 रुग्ण निघाले. 5 एप्रिलला 1729, 10 एप्रिलला 3970 आणि 16 तारखेला 6658 रुग्ण आढळले.

सरकार म्हणून देशातलं प्रत्येक राज्य सुद्धा कोरोना संपल्याच्या भ्रमात

लोक बेफिकीर आहेत, यात काहीच खोटं नाही. मात्र, सरकार म्हणून देशातलं प्रत्येक राज्य सुद्धा कोरोना संपल्याच्या भ्रमात होतं, हे नाकारुन चालणार नाही. 2 दिवसांपूर्वी महाराष्ट्रात लॉकडाऊन झालं, त्यानंतर देशातही कसे निर्बंध सुरु झाले, त्यावरही नजर टाकुयात.

महाराष्ट्राशिवाय इतर राज्यांची स्थिती काय?

महाराष्ट्रानंतर राजस्थानात विकेंड लॉकडाऊन झालाय. दिल्लीत दर रविवारी लॉकडाऊनचा निर्णय घेतला गेलाय. उत्तर प्रदेशातही दर रविवारी संपूर्ण लॉकडाऊन केलं गेलंय. मध्य प्रदेशातल्या जिल्ह्यांमधले निर्बंध वाढवले गेले आहेत. ओडिशात कडक निर्बंध आहेत. पंजाबमध्ये महाराष्ट्राआधीच निर्बंध लागले आहेत. छत्तीसगडच्या काही जिल्ह्यांमध्ये 10 दिवस लॉकडाऊन झालंय. कर्नाटकात लॉकडाऊनसंदर्भात बैठक बोलावली गेलीय. बिहारमध्ये इंडियन मेडिकल कॉऊन्सिलनं लॉकडाऊनचं आवाहन केलंय.

आता जगाच्या तुलनेत संपूर्ण भारतातली रुग्णवाढ

15 एप्रिलला ब्राझिलमध्ये 80 हजार रुग्ण सापडले. अमेरिकेत 74 हजार, फ्रान्समध्ये 38 हजार, रशियात 9 हजार आणि भारतात तब्बल 2 लाख 16 हजार कोरोना बाधित रुग्ण आढळले. रुग्णवाढीचा हा वेग अजून काही दिवस कायम राहिला, तर भारत अमेरिकेला मागे टाकून जगातला सर्वाधिक कोरोना बाधित रुग्णांचा देश बनेल. कारण, याच घडीला जगातले जे सर्वाधिक 20 बाधित शहरं आहेत, त्यात एकट्या भारतातल्या 15 शहरांचा समावेश आहे.

भारतात कोरोनाची लाट नाही, तर त्सुनामी

मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, बंगळूर, चेन्नई, ओडिशातलं कामरुप ही शहरं जगातली सर्वाधिक बाधित शहरं आहेत. याशिवाय ब्राझिलमधलं रियो द जेनेरो, साओ पाऊलो, अमेरिकेतलं लॉस एंजल्स यात कोरोनाचा सर्वाधिक फैलाव झालाय. भारतातली लाट ही लाट नसून त्सुनामी आहे. त्याची कारण नीट समजून घेऊयात. भारतातली पहिली लाट गेल्या 1 मे ला सुरु झाली. 1 मे 2020 ला 2394 रुग्ण सापडले होते. हा आकडा दिवसाला 97 हजार होईपर्यंत साडेचार महिने लागले. गेल्या वर्षी 16 सप्टेंबरला देशातले सर्वाधिक म्हणजे 97 रुग्ण निघाले.

अडीच महिन्यातच दिवसाला 2 लाख 16 हजारांचा टप्पा

दुसरी लाट बरोबर 1 फेब्रुवारीला सुरु झाली. 1 फेब्रुवारीला देशात 8587 रुग्ण होते. मात्र, 1 फेब्रुवारीनंतरच्या फक्त अडीच महिन्यातच दिवसाला 2 लाख 16 हजारांचा टप्पा गाठला गेला. देशात कोरोनाची पहिली लाट साडेचार महिने राहिली. युरोपची आकडेवारी बघितली, तर फ्रान्समध्ये 3 महिने दुसरी लाट होती. रशियातही बरोबर 3 महिन्यानंतर कोरोना ओसरला. ब्रिटनमध्ये 2 महिन्यातच कोरोनाचा कहर कमी झाला. स्पेनमध्येही 3 महिन्यांनी दुसरी लाट मंदावली.

दुसऱ्या लाटेचा हा कहर साधारण कधीपर्यंत थांबेल?

जगात आतापर्यंत इस्रायल आणि ब्रिटन या दोनच देशांनी लसीकरण करुन कोरोना थांबवलाय. भारतात लस सोडाच, मात्र इंजेक्शन, बेड आणि ऑक्सिनजची मारामार होतेय. देशातल्या 10 राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा भासण्याची चिन्हं आहेत. 5 ते 6 राज्यांत रेमडेसिव्हीरचा तुटवडा झालाय. मुंबई-पुण्यापाठोपाठ सूरत, लखनौ, दिल्ली, इथंही बेड कमी पडण्याच्या वाटेवर आहेत. त्यामुळे फायझर, स्पुतनिक सारख्या लसींच्या मंजुरीत फार वेळ न दवडता तातडीनं लसीकरणं व्हावं, अशी मागणी तज्ज्ञ करतायत.

महाराष्ट्र दुसऱ्या लाटेचा फक्त ट्रेलर

देशात एकाच वेळेला कोरोनाची लाट कमी होणार नाही. कारण, युरोपातले संपूर्ण देश हे भारतातल्या एक-एक राज्यांपेक्षाही छोटे आहेत. पहिल्या लाटेत आधी केरळ आणि मग महाराष्ट्र बाधित झाला., दुसऱ्या लाटेतही तेच घडलं…. महाराष्ट्र-केरळनंतर हळूहळू इतर राज्यांत रुग्णवाढ झाली. त्यामुळे महाराष्ट्र हा दुसऱ्या लाटेचा फक्त ट्रेलर होता. महाराष्ट्रातली रुग्णवाढ ही देशासाठी सतर्क होण्याची एक संधी होती. मात्र, देश म्हणून आपण ती संधी आपण गमावून बसलोय.

हेही वाचा :

BMC ने रुग्णांचे चाचणी अहवाल लवकर द्यावेत, बेड मिळण्यात अडचण येऊ देऊ नका : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

उस्मानाबादमध्ये कोरोना मृत्यूची लपवाछपवी, मृत्यूनंतर रुग्ण निगेटिव्ह, आक्षेपानंतर पुन्हा पॉझिटिव्ह

Maharashtra health department recruitment 2021 : महाराष्ट्रात 10 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची तातडीने भरती

व्हिडीओ पाहा :

Special report on Maharashtra corona and world situation

रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...