AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

क्रीडांगणावरच क्रीडा मंत्र्याचा तोल गेला, व्हॉलिबॉल टोलवताना भरणे मामाच कोसळले; थोडक्यात बचावले

क्रीडा मंत्र्‍यांनाही खेळ खेळण्याचा मोह आवरला नाही अन् त्या मोहापायी ते चक्क व्हॉलिबॉल खेळण्यासाठी चक्क मैदानात उतरले. याचे अनेक व्हिडीओही व्हायरल झाले.

क्रीडांगणावरच क्रीडा मंत्र्याचा तोल गेला, व्हॉलिबॉल टोलवताना भरणे मामाच कोसळले; थोडक्यात बचावले
Dattatray Bharane Volleyball Playing Video
| Updated on: Jan 24, 2025 | 12:01 AM
Share

Dattatray Bharane Volleyball Playing Video : राज्याचे क्रीडामंत्री इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी नुकताच पदभार स्वीकारला. दत्तात्रय भरणे यांनी नुकतंच पुणे जिल्ह्यातील एका क्रीडाप्रसंगी व्हॉलीबॉल खेळण्याचा आनंद लुटला. मात्र व्हॉलीबॉल खेळत असताना त्यांचा तोल गेला आणि ते खाली जमिनीवर कोसळले. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावेळी दत्तात्रय भरणे यांना दुखापत झाली आहे. मात्र सुदैवाने यात ते थोडक्यात बचावले.

पुण्याच्या मावळमध्ये एका महाविद्यालयातील क्रीडा संकुलाचे उद्घाटन पार पडले. या क्रीडा संकुलाचे उद्धाटन क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी अनेक खेळाडू आणि क्रीडा शिक्षकांनी विविध खेळ खेळण्याचा आनंद घेतला. यावेळी क्रीडा मंत्र्‍यांनाही खेळ खेळण्याचा मोह आवरला नाही अन् त्या मोहापायी ते चक्क व्हॉलिबॉल खेळण्यासाठी चक्क मैदानात उतरले. याचे अनेक व्हिडीओही व्हायरल झाले.

दत्तात्रय भरणेंनी घेतला व्हॉलिबॉल खेळण्याचा आनंद 

या व्हिडीओत क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे हे व्हॉलिबॉल खेळण्याचा आनंद घेताना दिसत आहेत. सुरुवातीला दत्तात्रय भरणेंनी व्हॉलिबॉल योग्यरित्या टोलावला. त्यानंतर समोरच्या टीमने व्हॉलिबॉल टोलवला. हा व्हॉलिबॉल नेटच्या पुढं आला आणि त्यावेळी दत्तात्रय भरणे हे तो व्हॉलिबॉल टोलवण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांचा तोल गेला आणि ते जमिनीवर कोसळले. यात त्यांना मुक्का मार लागला.

जो पडतो तोच सावरतो, दत्तात्रय भरणेंचे वक्तव्य

यावेळी डोक्याला दुखापत होण्यापासून ते थोडक्यात बचावले. व्हॉलिबॉल खेळत असताना त्यांचा तोल गेला. ते पडत असताना त्यांचं डोकं लोखंडी पोलवर आपटण्याची शक्यता होती. मात्र, लोखंडी पोलवर धडकण्याच्या आधी त्यांनी स्वत:ला सावरलं. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र त्यांना मुक्का मार लागल्याची कबुली त्यांनी जाहीरपणे दिली. तसेच राजकारणात 2014 साली पडलो, पुन्हा 2019 ला राज्यमंत्री झालो आणि आत्ता कॅबिनेट मंत्री झालो, जो पडतो तोच सावरतो असे वक्तव्य दत्ता भरणे यांनी केले.

बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येताच फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येताच फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
मुंबईत महापौर कोणाचा? युतीची घोषणा करताच राज ठाकरे यांनी थेट म्हटलं...
मुंबईत महापौर कोणाचा? युतीची घोषणा करताच राज ठाकरे यांनी थेट म्हटलं....
मन गहिवरलं, डोळे पाणावले... दोन्ही ठाकरे बंधू एकत्र अन् मनसैनिक भावनिक
मन गहिवरलं, डोळे पाणावले... दोन्ही ठाकरे बंधू एकत्र अन् मनसैनिक भावनिक.
माझ्याकडे खूप VIDEO, ज्यात CM अल्लाह हाफिज... राज ठाकरेंचा गौप्यस्फोट
माझ्याकडे खूप VIDEO, ज्यात CM अल्लाह हाफिज... राज ठाकरेंचा गौप्यस्फोट.
राज ठाकरेंकडून ऐतिहासिक घोषणा अन् मुंबई महापौर पदावरून केला मोठा दावा
राज ठाकरेंकडून ऐतिहासिक घोषणा अन् मुंबई महापौर पदावरून केला मोठा दावा.
भाजप सोबत येत सेल तर.... जालना युतीवरून अर्जुन खोतकर यांचं मोठं विधान
भाजप सोबत येत सेल तर.... जालना युतीवरून अर्जुन खोतकर यांचं मोठं विधान.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेपूर्वी दोघांचा एकत्र प्रवास, बघा VIDEO
ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेपूर्वी दोघांचा एकत्र प्रवास, बघा VIDEO.
मुंबईत महायुतीत रस्सीखेच; भाजप, शिंदेसेना, दादांच्या NCP मध्ये पेच
मुंबईत महायुतीत रस्सीखेच; भाजप, शिंदेसेना, दादांच्या NCP मध्ये पेच.