AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Love Jihad: श्रीरामपूर लव्ह जिहाद प्रकरण तापलं, हिंदूत्ववाद्यांच्या मोर्चानंतर पोलीस महानिरीक्षक थेट श्रीरामपुरात, शेवटच्या आरोपीपर्यंत पोहचण्याचे दिले आश्वासन

लव्ह जिहाद आणि मुलींना वाममार्गाला लावण्याच्या प्रकरणात नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांनी श्रीरामपूर येथे पोलीस ठाण्याला भेट दिली.  यावेळी त्यांनी या प्रकरणाचा आढावा घेतला. आत्तापर्यंत चार प्रकरणे समोर आली असून काही आरोपींना पोलीसांनी जेरबंद केले आहे. लव्ह-जिहाद प्रकरणाचा पोलीस कसून तपास करत असून, शेवटच्या आरोपीपर्यंत पोहचल्याशिवाय पोलीस थांबणार नाही. अशी ग्वाही यावेळी बी जी शेखर यांनी दिली आहे.

Love Jihad: श्रीरामपूर लव्ह जिहाद प्रकरण तापलं, हिंदूत्ववाद्यांच्या मोर्चानंतर पोलीस महानिरीक्षक थेट श्रीरामपुरात, शेवटच्या आरोपीपर्यंत पोहचण्याचे दिले आश्वासन
लव्ह जिहाद प्रकरणाची आयजींकडून दखलImage Credit source: TV 9 marathi
| Edited By: | Updated on: Sep 01, 2022 | 10:09 PM
Share

श्रीरामपूर – अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर (Shrirampur)शहरात लव्ह जिहाद (Love Jihad)आणि मुलींच्या अपहरणाच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. गेल्या चाळीस दिवसापासून बेपत्ता मुलींचा तपास लावावा आणि आरोपींना कठोर शासन करावे, या मागणीसाठी आज शिवप्रहार प्रतिष्ठाणने शहर पोलीस ठाण्यावर मोर्चा (march on police station)काढला. श्रीरामपूर शहरातील लव्ह जिहादचा मुद्दा समोर आणल्यानंतर या प्रकरणात दररोज धक्कादायक घटना समोर येताना दिसताहेत. आत्तापर्यंत पाच मुलींची सुटका पोलीस आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या माध्यमातुन झाली आहे. आणखी अनेक प्रकार श्रीरामपूर तालुक्यात घडले असून, गेल्या चाळीस दिवसापासून बेपत्ता मुलीचा तपास लावावा या मागणीसाठी आज शिवप्रहार प्रतिष्ठानने पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केले. आरोपी मुल्ला कटर आणि त्याच्या साथीदारांनी अनेक मुलींचे जीवन उध्वस्त केले आहे. त्यासोबतच निकाह लावणारा काझी आणि इतरांना अटक करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला. या आंदोलनाची दखल थेट नाशिक विभागाच्या पोलीस महानिरीक्षकांनी घेतली आहे. त्यांनी आज श्रीरामपूर पोलीस ठाण्याला भेट दिली.

काय म्हणाले पोलीस महानिरीक्षक?

लव्ह जिहाद आणि मुलींना वाममार्गाला लावण्याच्या प्रकरणात नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांनी श्रीरामपूर येथे पोलीस ठाण्याला भेट दिली.  यावेळी त्यांनी या प्रकरणाचा आढावा घेतला. आत्तापर्यंत चार प्रकरणे समोर आली असून काही आरोपींना पोलीसांनी जेरबंद केले आहे. लव्ह-जिहाद प्रकरणाचा पोलीस कसून तपास करत असून, शेवटच्या आरोपीपर्यंत पोहचल्याशिवाय पोलीस थांबणार नाही. अशी ग्वाही यावेळी बी जी शेखर यांनी दिली आहे. या दोषींना कठोर शिक्षा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. नागरीकांनीही पुढे येवून पोलीसांना सहकार्य करण्याचं आवाहनही पोलीस महानिरीक्षकांनी केले आहे.

काय आहे प्रकरण?

अल्पवयीन विद्यार्थिनींना शाळेतून पळवून नेत त्यांच्याशी बळजबरीने निकाह लावण्याच्या घटना घडत असल्याचे सांगण्यात येते आहे. या परिसरात 25 ते 26 जणांची टोळी कार्यरत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो आहे. आत्तापर्यंत 10 हून जास्त मुलींचे अपहरण करुन त्या बेपत्ता असल्याचे सांगण्यात येते आहे. या मुलींचे  धर्मांतरण करुन त्यांना वेश्या व्यवसाय करण्यासाठी पाठवले जात असल्याचा आरोप करण्यात येतो आहे.  हा मुददा विधानसभेतही उपस्थित करण्यात आला आहे. आमदार नितेश राणे यांनी हा मुद्दा मांडला होता. या प्रकरणात एका पोलीस अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.