एसटीतील ‘त्या’ कर्मचाऱ्यांचं पुन्हा प्रशिक्षण होणार; कोरोना काळात घेतलेला निर्णय अखेर मागे

आता ही प्रक्रिया पुन्हा सुरु करण्यात येणार आहेत, अशी माहिती ॲड. अनिल परब यांनी दिली आहे. (Anil Parab Decision ST candidates)

एसटीतील 'त्या' कर्मचाऱ्यांचं पुन्हा प्रशिक्षण होणार; कोरोना काळात घेतलेला निर्णय अखेर मागे
अनिल परब, परिवहन मंत्री
Follow us
| Updated on: Feb 15, 2021 | 8:48 PM

मुंबई : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आर्थिक काटकसर आणि उपलब्ध कर्मचाऱ्यांचा पर्याप्त वापर करण्याच्या हेतूने काही उमेदवारांची निवड करण्यात आली होती. त्यानुसार विविध संवर्गातील सुमारे 3116 प्रशिक्षणार्थी उमेदवारांचे प्रशिक्षण खंडित करण्यात आले होती. मात्र आता ही प्रक्रिया पुन्हा सुरु करण्यात येणार आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिली आहे.  (ST candidates training Stay Cancelled Anil Parab Information)

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण भारतात टाळेबंदी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे एसटी महामंडळाची प्रवासी सेवा मोठ्या प्रमाणात ठप्प झाली होती. यामुळे आर्थिक स्रोत पूर्णपणे थांबले होते. अशावेळी अतिरिक्त खर्चाला लगाम घालवा या उद्देशाने 2016-17 व 2019 अंतर्गत काही उमेदवारांची निवड झाली होती.

या निवड झालेल्या विविध संवर्गातील सुमारे 3116 प्रशिक्षणार्थी उमेदवारांचे प्रशिक्षण आणि अंतिम निवड प्रक्रिया तात्पुरती खंडित करण्यात आली होती. यामध्ये 2846 पुरुष, 161 महिला, 2 पर्यवेक्षक आणि 107 अधिकाऱ्याचा समावेश होता.

सद्यस्थितीला एसटी महामंडळाची सेवा पूर्ण क्षमतेने सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील प्रवासी गर्दीचा हंगाम विचारात घेता उपरोक्त निवड झालेल्या सर्व कर्मचारी/अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण ज्या टप्प्यावर थांबले होते. त्या टप्प्यापासून पुन्हा सुरु करण्यात येत आहे. महामंडळाच्या या  निर्णयाचे स्वागत प्रशिक्षणार्थी उमेदवारांनी केले आहे.

(ST candidates training Stay Cancelled Anil Parab Information)

संबंधित बातम्या :

Corona virus | वुहानमध्ये कोरोनाचे 13 प्रकार, अंदाजापेक्षा तब्बल 500 टक्क्यांनी जास्त संहारक, जाणून घ्या मोठे खुलासे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आघाडीच्या आमदारांशी बोलणार; तीन दिवस मॅरेथॉन बैठका

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.