एसटीची भाडेवाढ मध्यरात्रीपासून लागू, पाहा किती वाढले दर ?
एसटी महामंडळाने आपल्या सर्व प्रकारच्या सेवांमध्ये येत्या २५ जानेवारीपासून म्हणजे ( रात्री १२ वाजता ) रात्री १२ वाजल्यापासून भाडेवाढ लागू केली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला मोठा भार पडणार आहे.

राज्याच्या ग्रामीण भागाची जीवनवाहीनी म्हटली जाणाऱ्या एसटीच्या तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत एसटीच्या भाडे वाढीला मंजूरी देण्यात आली आहे. येत्या २५ जानेवारीपासून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशावर मोठा भार येणार आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाची २७६ वी बैठक परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव , राज्य परिवहन प्राधिकरणाचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली. या बैठकील राज्य परिवहन प्राधिकरणाचे सदस्य अतिरिक्त पोलीस महासंचालक (वाहतुक) आणि परिवहन आयुक्त देखील उपस्थित होते. या बैठकीत एसटीला १४.९५ टक्के भाडे वाढ करण्यास मंजूरी मिळाली आहे.
साध्या बसेच भाडे पुढील प्रमाणे – ( आरक्षण आकार वगळता )
स्थानक | सध्याचे भाडे | प्रस्तावित | तफावत |
---|---|---|---|
दादर ते स्वारगेट | २३५ | २७२ | ३७ |
दादर ते पुणे रेल्वे स्थानक | २२५ | २६२ | ३७ |
अलिबाग ते मुंबई | १६० | १८२ | २२ |
दापोली ते मुंबई | ३४० | ३९३ | ५६ |
मुंबई ते कोल्हापूर | ५६५ | ६५४ | ८९ |
मुंबई ते सांगली | ५८५ | ६७४ | ८९ |
पुणे ( श.नगर ) ते छत्रपती संभाजी नगर | ३४० | ३९३ | ५३ |
नाशिक ते कोल्हापूर | ६७० | ७७५ | १०५ |
पुणे ( स्वारगेट ) ते सोलापूर | ३६५ | ४२३ | ५८ |
पुणे ( शि.नगर ) ते नागपूर | १०८० | १२४७ | १६७ |
डिझेल, चेसीस, टायर या घटकांच्या किंमती वाढल्यामुळे तसेच महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे आपोआप भाडेवाढ सुत्रानुसार उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांनी दिनांक ०१ फेब्रुवारी २०२५ रोजीच्या पत्रानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसच्या प्रवासी भाडेदरात वाढ करण्याचा प्रस्ताव सादर केला होता.या प्रस्तावास राज्य परिवहन प्राधिकरणाच्या २७६ व्या बैठकीत मंजूरी मिळाली आहे. हकिम समितीने निश्चित केलेल्या सुत्रानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला टप्पा वाहतूक सेवांच्या भाडेदरामध्ये १४.९५ टक्के वाढ करण्यास मान्यता मिळाली आहे. ही भाडेवाढ दि २५ जानेवारी २०२५ ( दिनांक २४.०१.२०२५ च्या मध्यरात्रीनंतर ) पासून लागू करण्याचे आदेश प्राधिकरणाने दिले आहेत.




भाडेवाढ पुढील प्रमाणे आहे: